Benefits Of Ghee : गायीचं दूध अन् तुपाचं सेवन आरोग्यासाठी खुपच लाभदायक ! होतात अनेक फायदे, जाणून घ्या योग्य पध्दत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रत्येक व्यक्तीला आपले शरीर लवचिक असावे असे वाटत असते. यासाठी प्रत्येकजण कोणते ना कोणते उपाय करत असतात. जेणेकरुन त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासह डान्स आणि आपल्या लाइफस्टाइनचाही योग्य पद्धतीने आनंद घेता येईल. शरीर लवचिक राहण्यासाठी तुम्ही देखील भरपूर कष्ट घेत आहात का ? तर मग यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात तुपाचा समावेश अवश्य करा.

आहारामध्ये तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरु शकते. तुपाच्या सेवनामुळे तुम्हाला अन्य शारीरीक फायदे देखील भरपूर प्रमाणात मिळतात. नियमित योग्य प्रमाणात तुपाचे सेवन केल्यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार देखील शुद्ध तूप आपल्या हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

शरीराला दोन प्रकारे होतो पोषण तत्वांचा पुरवठा

शरीर लवचिक राहण्यासाठी आपल्या स्नायूंना आवश्यक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सोबतचे आपले हाडे देखील मजबूत असणं गरजेचं आहे. शरीराच्या या दोन्ही गरजा पूर्ण करण्यात तूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. पण गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप सेवन केले तर ते अधिक फायदेशीर ठरते.

स्नायू लवचिक होतात

आयुर्वेदात देखील गायीच्या दुधाचा आणि तुपाचे खूप फायदे असल्याचे म्हटले आहे. गायीच्या तुपाचे सेवन केल्याने आपल्या शरीराच्या आतील अवयवांनाही खोलवर पोषक घटकांचा पुरवठा करण्याचे कार्य केले जाते आणि मेंदूची कर्यप्रणाली देखील चांगली ठेवण्यात मदत होते. तसेच गाईच्या दुधापासून तयार केलेले तूपच नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात आणि पौष्टिक चरबी असते. म्हणूनच गायीच्या तुपामुळे मेंदू आणि शरीराला नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वाचा पुरवठा होण्यास मदत मिळते. दुसरीकडे म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे सेवन केले तर शरारीमध्ये चरबी वाढण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी गरम दुधासह गायीच्या तुपाचे सेवन करावे. मात्र हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

शरीराच्या अंतर्गत पेशींचे पोषण

आयुर्वेदातील माहितीनुसार, गायीच्या दुधामध्ये तूप मिक्स करुन पिल्यास आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक तसंच औषधी गुणधर्मांचा पुरवठा होतो. कारण गायीच्या तुपात नैसर्गिक स्वरुपातील चांगली चरबी तसेच अँटी बॅक्टेरिया आणि अँटी ऑक्सिडेंट्स हे घटक असतात. दूध आणि तूप एकत्र करुन प्यायल्यास शरीराच्या अंतर्गत पेशींना देखील पोषण तत्त्वाचा पुरवठा होतो.

चयापचयाची क्षमता वाढते

गायीच्या दुधामध्ये तूप मिक्स करुन प्यायल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरामध्ये ऊर्जा असल्यास आपले अवयव लवचिक राहू शकतात. यासाठी पौष्टिक आहारासह नियमित व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगासने, व्यायाम प्रकाराचा सराव करावा.

कार्य क्षमता वाढण्यास मदत होते

गायीच्या दुधात तूप मिक्स करुन प्यायल्यास शरीराची क्षमता आणि सहन शक्ती दोन्ही वाढते. सोबतच यामुळे स्ट्रेचिंग पावर देखील वाढण्यास मदत मिळते. म्हणजे तुम्ही शरीराचे योग्य प्रकारे स्ट्रेचिंग आणि हालचाल करु शकता. पण यासाठी नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

खास टीप – आपल्या आहारात कोणत्याही गोष्टीचा समावेश करण्यापूर्वी आहरतज्ज्ञ तसंच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.