ब्लड प्रेशर आणि वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की समावेश करा, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – रक्तदाब आणि वजन वाढणे या समस्या सध्या खूपच सर्वसाधारण झाल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की, असा एखादा डायट प्लॅन असावा ज्यामुळे सर्व काही नियंत्रणात राहील. त्यावर डॅश डायट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सोडिअमचे कमीत कमी प्रमाण असलेल्या आहाराला डॅश डायट म्हणतात.

शरीरातील सोडिअमच्या जास्त झालेल्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाब सारखे आजार भेडसावतात. उच्च रक्तदाब हा जास्त वजनामुळे किंवा चुकीच्या आहारामुळे मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तुम्ही आहाराची चांगली काळजी घ्या जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य राहील.

डॅश डायट हा असा आहार आहे ज्यात आपण दररोज फळे, भाज्या आणि कमी फॅटवाले पदार्थ खातो. यात संपूर्ण धान्य, मासे, शेंगदाणे आणि अंडी यांचा समावेश असतो. तसेच, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविणार्‍या गोष्टी खाऊ नका. ज्यामध्ये मिठाई, सोडा, चॉकलेट आणि दुधाच्या उत्पादनांचा समावेश आहे.

डॅश डायटमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर हिरव्या पाल्या भाज्या खाऊ शकता. यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीराला ऊर्जा मिळते आणि दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने नेहमी फायदाच होतो. जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन सारखे पदार्थ रात्री खाणे टाळा.

चिप्स आणि मिठाई सारखे पदार्थ देखील आहारात मोठ्या प्रमाणात ठेवू नका. बदाम, कमी फॅट असलेले दही,मीठ आणि लोणी नसलेले पॉपकॉर्न तसेच कच्च्या पालेभाज्या खाऊ शकता. डॅश डायटसाठी तुम्ही भात आणि पास्ता सारखे पदार्थ देखील खाऊ शकता. त्या सोबतच ब्रेड,कच्च्या पालेभाज्या, फळे आणि दूध असे पदार्थ देखील खाऊ शकता.

फेसबुक पेज लाईक करा –