थंडीमध्ये पोटाच्या आजारांवर गुळाचे ‘सेवन’ हा ‘रामबाण’ उपाय, असा करा वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. तसेच गुळामुळे अनेक आजार देखील नाहीसे होतात. पोटाच्या अनेक आजरांपासून देखील गुळ खाल्याने सुटका मिळते. जाणून घेऊयात गुळाचे अधिक फायदे

जर तुम्ही गुळ खात नसाल तर लवकरात लवकर खाण्यास सुरवात करा. कारण गुळ तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पोटाच्या सर्व समस्यांसाठी गुळाला रामबाण उपाय मानले जाते. गॅसपासून ते खोकल्यापर्यंत सर्व समस्यांमध्ये गुळ खाल्ल्याने फायदा होतो. गूळ खाल्ल्याने अन्न पचन होते आणि पचन क्रिया देखील चांगली होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडासा गुळ खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने तुमची बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी मदत होते.

गुळामध्ये आयरनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे गुळाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. तसेच धमन्यांमध्ये लाला रक्ताचे प्रमाण अधिक वाढते. तसेच उच्च रक्तदाबामध्ये देखील गुळ खायला दिल्याने रक्त दाब नियंत्रणात राहतो. गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण योग्य प्रकारे असल्यामुळे हाडांचे आजार जाणवत नाहीत आणि शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते.

फेसबुक पेज लाईक करा –