थंडीमध्ये बटाटे खाणार्‍यांनी तात्काळ व्हाव सावध, शरीराला धोकादायक ठरू शकते जास्त सेवन

पोलिसनामा ऑनलाइन – Health Care Tips : लोक थंडीत बटाटे (potato) जास्त खातात, परंतु बटाट्याचे (potato) जास्त सेवन तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते. थंडी सुरू होताच लोकांच्या घरात बटाट्याचा(potato) जास्त वापर होऊ लागतो. बटाटे (potato) जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. जर फिट रहायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच बटाट्याचे (potato) सेवन बंद करा.

मधुमेहींसाठी विषासमान आहे बटाटा
मधुमेहींसाठी बटाटा विषासमान आहे. काही लोक बटाटा डिप फ्राय करून खातात. आरोग्यासाठी हे अजिबात चांगले नाही. रोज बटाट्याचे सेवन केल्याने वजन वेगाने वाढू शकते.

बटाट्याच्या जास्त सेवनाने फॅट आणि कॅलरीत वाढ होते. शुगर कंट्रोल करणे अवघड होते. बटाट्यात ग्लायसेमिक इंडेक्स असतो, यामुळे शरीरात ग्लूकोजची मात्रा खुप वाढते. शरीरात शुगरचा स्तर वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करू नये. बटाट्याचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो. आडवड्यात चारवेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बेक्ड, उकडलेले किंवा मॅश्ड बटाटे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका वाढतो.

बटाट्याने होते गॅसची समस्या
जर तुम्ही बटाटे जास्त खात असाल तर यामुळे गॅसची समस्या होते. पोटात गॅसच्या समस्येचे मोठे कारण असते बटाटा. यासाठी याचा वापर खुपच कमी करा.