भातासोबत दररोज ‘हे’ विष खाताय तुम्ही, नाही थांबवलं तर ‘कॅन्सर’नं होईल मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भात एक असा खाद्यपदार्थ आहे जो प्रत्येकाला खायला आवडतो. काही लोकांनां तर भाताशिवाय जेवण करणेच अशक्य वाटते. जर तुम्ही देखील यामध्ये मोडत असाल तर लवकरात लवकर सावध व्हा कारण एका रिसर्च अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रोज भात खाणारे लोक एकप्रकारे आपल्या पोटात विषच घेऊन फिरत आहेत आणि हे विष माणसाच्या पोटासाठी हानिकारक आहे.

रिसर्च नुसार, भात खाणारा व्यक्ती आपल्या शरीरात ‘आर्सेनिक’ (Arsenic) नामक पदार्थाला खात आहे जो की विषारी आहे. भातामध्ये आर्सेनिकचे प्रमाण इतके जास्त आहे की, तुम्ही ते नजरंदाज करू शकत नाहीत. रिसर्च अनुसार आर्सेनिक हा पदार्थ तुमच्या शरीरात जाताच तुम्हाला कॅन्सर, हृदया संबंधीचे आजार तसेच मधुमेह अशा अनेक आजारांना निमंत्रण देतो.

जास्त भात खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर
आर्सेनिक हे पदार्थ तुमच्यावर किती परिणामकारक ठरणार हे तुम्ही दिवसातून किती वेळा भात खाता त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा भात खात असाल तर तुम्हाला याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवणार नाही. लहान मुलांना मात्र भातापासून दूरच ठेवा. मात्र जर तुम्हाला भात खूपच आवडत असेल तरीही काळजी करायचे कारण नाही. आता तुम्ही भातामधून अशा विषारी पदार्थाला दूर करू शकता. जर तांदूळ जास्त पाण्यात घालून त्याचा भात बनवला तर आर्सेनिक रसायनचे प्रमाण कमी होऊ शकते.

मातीमध्ये असते आर्सेनिक
आर्सेनिक रसायन हे मातीमध्ये असते त्यामुळे मातीतून येणाऱ्या खाण्याच्या पदार्थांवर याचा परिणाम दिसून येतो. परंतु याची मात्र खूप कमी असते त्यामुळे शरीराचे काही नुकसान यामुळे होत नाही. कारण तांदूळ उगवताना पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तांदळाचे रोप जास्त वेळ पाण्यात बुडून असते यामुळे मातीतील आर्सेनिक हे रोप लगेच शोषून घेतात. इतर खाद्यपदार्थांच्या रोपांच्या तुलनेने तांदळात आणि नंतर केलेल्या भातात 10 ते 20 % जास्त आर्सेनिक रसायन येते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/