Amla Health Benefits : आवळा आरोग्यासाठी कसा फायदेशीर ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आवळा दिसायला जरी आकाराने लहान असला तरी त्यामध्ये खूप पोषक तत्त्व आहेत. आवळ्याचे सेवन तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये करू शकता. कच्चे आवळे केवळ हिवाळ्यातच मिळतात. आवळ्याचा रस, कँडी, चूर्ण आणि मोरावळा इत्यादी स्वरुपातील आवळा बाजारात सहजपणे उपलब्ध होते. तज्ज्ञांच्या सल्यानुसार तुम्ही वर्षभर आवळ्याचे सेवन करू शकता.आवळ्यापासून तयार केलेले कित्येक पौष्टिक पदार्थ आयुर्वेदिक दुकानांमध्येही सहजपणे उपलब्ध होतात. आवळ्यातील पोषक घटक शरीरातील वाढती चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त आवळ्याचे अनेक उपयोग आहेत.

व्हिटॅमिन सी आणि लोह
व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात.सोबतच शरीराचा मेटाबॉलिक रेट संतुलित ठेवण्यासही मदत करतात. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते. आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केले कि आपले शरीर फिट राहण्यास मदत होते. म्हणून डॉक्टर आवळा खाण्याचा सल्ला देतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह जास्त प्रमाणात असते. हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवळ्याचे सेवन करावे.

आयुर्वेदिक उपचारांमध्ये आवळ्याचा उपयोग पूर्वीपासूनच करण्यात येत आहे. आवळ्यातील पोषक गुणधर्मांमुळे आपले पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते.आवळ्यामुळे पचन संस्थेमध्ये विषारी पदार्थ जमा होत नाही आणि त्यामुळे आपली पचनक्रिया पण सुधारते. तसेच आवळ्यामुळे भूक लागण्याची समस्याही नियंत्रणात येते. आवळ्याचा रस ऑर्गेनिक फूड आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असतो. पण या रसाचे कसे आणि किती वेळा सेवन करायचे याची माहिती तज्ज्ञांकडून घ्यावी. आपल्या आहारामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यापूर्वी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते आपल्यासाठी खूप गरजेचे असते. आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार डॉक्टर एखाद्या गोष्टीचा डाएटमध्ये समावेश करण्याचा किंवा न करण्याचा सल्ला देतात.

फूड स्टोअर्समध्ये आवळा कँडी (Amla Benefits For Health) शक्यतो सहजासहजी मिळते. आवळा कँडी गोड अथवा मसालेदार स्वरुपात उपलब्ध असते. काही जण तोंडाला चव येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवळा कँडीचे सेवन करतात. पण जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण आपल्या आरोग्यासाठी आवळा कँडीच्या जागी कच्चे आवळे आणि त्याचा ताजा रस फार उत्तम आहे. डॉक्टरांकडून देखील नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असणारा आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याची पौष्टिक भाजी आणि लोणचे देखील घरच्या घरी बनवता येते.