Immunity improve kadha : कोरोना काळात इम्युनिटी मजबूत ठेवायची असेल तर दालचीनी आणि मधाचा काढा प्या, जाणून घ्या रेसिपी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना काळात इम्युनिटी मजबूत ठेवणे खुप आवश्यक ठरते. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी किचनमधील मसाले खुप उपयोगी आहेत. दालचीनी आणि मध वापरून एक खास काढा यासाठी तयार केला जातो, याची रेसिपी जाणून घेवूयात…

साहित्य

* 1 चथुर्तांश चमचा दालचीनी पावडर
* 1 चमचा मध
* 1 कप पाणी

कृती

हा काढा बनवण्यासाठी पाणी उकळवा. त्यामध्ये दालचीनी पावडर चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता हे पाणी 2 ते 3 मिनिटे चांगले उकळवा. नंतर एका कपात घेऊन त्यामध्ये मध मिसळा आणि चहासारखे गरमच प्या.

याचे सेवन कधी करावे ?

इम्युनिटी वाढवण्यासाठी दालचीनी-मधाचा काढा घरात सहज तयार करता येतो. याचा वापर सकाळी रिकाम्यापोटी करू शकता.