Coffee Benefits : जाणून घ्या दिवसात कितीवेळा कॉफी पिणे योग्य, ‘हे’ 4 आहेत ‘ब्लॅक कॉफी’चे फायदे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीचा कहर अजूनही सूरूच आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि मेडिकल एक्सपर्ट वॅक्सीन लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे काम करत आहेत. कारण यावेळी कोविड-19 चा कोणताही उपचार नाही आणि वॅक्सीन सुद्धा नाही. यासाठी सावधगिरी हाच चांगला बचाव आहे.

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक घरातून कमीप्रमाणात बाहेर पडत आहेत. बहुतांश लोक घरात बंद आहेत आणि घरातूनच काम करत आहेत. यादरम्यान, चहा आणि कॉफीचा खप वाढला आहे. असे म्हटले जात आहे की, सोफा किंवा बेडवर बसून काम केल्याने जांभया येऊ लागतात, हे टाळण्यासाठी अनेक लोक चहा किंवा कॉफी पीत आहेत.

मात्र, अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे झोप न येण्याच्या आजाराचा धोका वाढतो. ब्लॅक कॉफी हे वर्क आऊटसाठी बेस्ट ड्रिंक मानले जाते, परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे की, एका दिवसात किती कप कॉफी पिता. जर तुम्ही लॉकडाऊनमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागृत आहात, तर हे जाणून घेणे जरूरी आहे की दिवसात किती कप कॉफी पिणे योग्य आहे.

किती कप कॉफी प्यावी
अनेक प्रकारच्या रिसर्चमधून समजले आहे की, कॉफी आरोग्यासाठी लाभदायक असते. विशेषता ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी चांगली आहे. योग्य प्रमाणात ती प्यायली पाहिजे. यात कॅफीन आढळते. जर कॅलरी आणि फॅटसह कॉफीचे सेवन करत असाल, तर तुम्ही एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

1 यामुळे शरीराला उर्जा मिळते.

2 ती मेटाबॉलिज्मला गती देते.

3 वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देते.

4 यामुळे भूख कमी लागते. जास्त जेवणावर नियंत्रण राहू शकते.