Congo Fever : ‘कांगो’ ताप कसा पसरतो ? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम : एकीकडे जग कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देत असतांना भारतातील पालघर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मात्र प्राणघातक क्रिमियन कांगो हैमरेज (CCFH) या तापासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की हा विषाणूजन्य रोग एका विशिष्ट किड्याच्या एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यामध्ये संक्रमित होतो.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व मांस व कुक्कुट विक्रेते व ग्राहकांना सावध राहून कॉंगो तापाच्या विषयी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे ज्यांचे मृत्यूचे प्रमाण १० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. हा किडा संक्रमित प्राण्यांच्या रक्त आणि त्यांचे मांस खाऊन मनुष्याला इजा पोहोचवितो.हा रोग आढळला आणि वेळेत उपचार न घेतल्यास 30 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. अलीकडे या संदर्भात कोणतीही लस उपलब्ध नाही.

कांगो ताप म्हणजे काय

कांगो ताप हा एक प्रकारचा विषाणू आहे जो प्राण्यांमध्ये आढळतो आणि तो प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर मानवांमध्ये पसरतो. आफ्रिका व युरोपियन देशांमध्ये कांगो ताप सर्वाधिक असल्याचे मानले जाते. तथापि, आता त्याने इतर काही देशांमध्येही याचा विस्तार केला आहे.

कांगो तापाची लक्षणे

१. स्नायू वेदना आणि ताप.

२. चिडचिड, चक्कर येणे,डोळ्यांमध्ये जळ जळ यासारख्या समस्या सुरू होणे.

३. पाठदुखी, उलट्यांचा त्रास, यासारख्या समस्या.

४. तोंड आणि नाकातून रक्तस्त्राव.

५. अवयव निकामी होण्याची शक्यता.

ताप न येण्यासाठी काय करावे लागेल.

१. कांगो ताप टाळण्यासाठी शेती व पशूंसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी (पिशु / चिंचरा) सह खबरदारी घेणे आवश्यक आहे.

२. संरक्षणासाठी पूर्ण-कपडे तसेच जोडा आणि मोजे घाला.

३. गाय, म्हैस, बकरी इत्यादीच्या शरीरावर काही लागले असल्यास, त्याला त्वरित पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखवा.