संक्रमित व्यक्तीकडूनच नव्हे तर ‘या’ 4 ठिकाणांवरून सुद्धा पसरू शकतो ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसची सतत वाढणारी प्रकरणे पहाता असे म्हणणे सुद्धा पूर्णपणे योग्य ठरणार नाही की, घरात राहून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. असे अशासाठी, कारण थोडेजरी दुर्लक्ष झाले तरी याचा धोका होऊ शकतो. जरी तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला नाहीत तरी सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. हे कसे? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. आपण काही अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत ज्या कोरोना व्हायरस पसरवणार्‍या जागा आहेत. अशा ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि सॅनिटाइज करणे खुप गरजेचे आहे, तेव्हाच तुम्ही संसर्गापासून वाचू शकता.

1 स्टेनलेस स्टील

किचनमध्ये ठेवलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवर कोरोना सहज राहू शकतो. अशा भांड्याची, वस्तूंची नियमित स्वच्छता करा. दरवाजांच्या कड्या आणि हँडलसुद्धा स्वच्छ करा.

2 एटीेएम स्क्रीन आणि बटन्स

कोरोना महामारी दरम्यान एटीएम मशीन धोकादायक जागांपैकी एक आहे. येथून संसर्ग पसरण्याची मोठी शक्यता असते. या मशीनचा वापर केल्यानंतर हात धुवा, सॅनिटाइज करा. एटीएमच्या स्क्रीनवर आणि बटन्सवर कोरोना व्हायरस असू शकतो.

3 हॉस्पिटल्स

कोरोनाचा उपचार होत असलेल्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे. नियमित स्वच्छता आणि सॅनिटायझेन आवश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये गेलात तर फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनेटाइजर इत्यादी सोबत घेऊन जा.

4 सेलफोन स्क्रीन

सेलफोन अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरस आणि जर्म्सचा वाहक आहे. याची स्क्रीन नियमित स्वच्छ करा. तसेच लॅपटॉप, टीव्ही रिमोट यांची स्वच्छता ठेवा, सॅनिटाईज करा.