CoronaVirus Harmful Effect : हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम – वैज्ञानिकांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंंस्था – कोरोनाचा कहर संपूर्ण जगात सुरु आहे, दिलासादायक बाब म्हणजे जितक्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत तितकेच रिकव्हर देखील होत आहेत. धक्कादायक बाब अशी की जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्या हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर कोरोनाचा विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मेडिसिन केमिस्ट्रीचे प्रसिद्ध वैज्ञानिक प्रो. राम शंकर उपाध्याय यांच्या मते कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर कोरोनाचा घातक परिणाम दिसून येत आहे. ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यांच्यात हृदय आणि फुप्फुसांसंबंधीचे आजार वाढण्याचा धोका आहे.

संपूर्ण जगात कोरोना संक्रमित लोकांची संख्या कोट्यवधी असणार आहे. लॅनसेटने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या उपचारानंतर 55% लोकांमध्ये मज्जासंस्थेसंबंधी तक्रारी दिसून आल्या आहेत.

जर्मन मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झालेल्या लोकांपैकी 75% लोकांच्या हृदयाच्या संरचनेत बदल दिसून आला आहे. अशा परिस्थितीत भविष्यात लोकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे माहित करून घेणं गरजेचं आहे.

कोरोनाच्या उपचाराबद्दल बोलताना मेडिसिनल केमिस्ट्रीच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी त्याच्या लसीवर काम सुरु आहे, पण त्याआधी कोरोना संक्रमण रोखणे आणि त्यावर तात्पुरत्या इलाजासाठी औषध शोधणे महत्वाचे आहे.

ते म्हणाले, कॅन्सर वरील जवळजवळ 15 औषधं आणि काही अँटी इन्फ्लेमेंटरी औषधं कोरोनाचा इलाज करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.