Coronavirus : ‘ई-सिगरेट’ तसेच ‘स्मोकिंग’नं वाढू शकतो ‘कोरोना’ व्हायरसचा धोका

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरनाचा धोका ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आहे तसाच तरुणानां देखील आहे. खासकरून हृदयरोग, श्वसन रोग, मधुमेह किंवा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराने अधिपासूनच ग्रस्त असलेल्यांना या रोगाचा धोका अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय ई-सिगारेट ओढणाऱ्या लोकांनाही कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. कोरोना विषाणूचा धोका हृदयाशी आणि फुफ्फुसांशी संबंधीत समस्या असलेल्यांना अधिक असतो, हे एका अहवालातून सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत ई-सिगारेट, तंबाखू खाण्याची सवय असणाऱ्यांना देखील कोरोनाचा धोका वाढला आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे प्रवक्ते मायकेल फेलबबॉम यांनी सांगितले की, हृदय आणि फुफ्फुसांचा आजार असलेल्या लोकांना कोरोना अधिकच धोकादायक ठरू शकतो. यामध्ये ई-सिगारेट, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करतात यांना कोरोनाचा धोका अधिक असतो. ई-सिगारेट ओढल्यामुळे फफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहचू शकतो.

तंबाखू, ई-सिगारेटमुळे कोरोनाचा धोका

या संदर्भामध्ये अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. यामागे ई-सिगारेट हे मोठे कारण असू शकते. नॅशल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अँब्युजच्या प्रमुख नोरा वाल्को यांनी नुकतेच एका ब्लॅगमधून इशारा दिला आहे कि, खासकरून तंबाखू, चरस, सिगारेट किंवा ई-सिगारेट वापणाऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका अधिक असतो, असे त्यांनी आपल्या ब्लॅगमध्ये लिहले आहे.

ई-सिगारेट आरोग्याला धोकादायक

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, ई-सिगारेट ओढण्यामुळे कोरोना विषाणूचा धोका सामान्य धुम्रपानापेक्षा कमी किंवा काधीकधी सर्वाधिक असतो. यामुळे कोरोनाचा धोका वाढत नाही तर याचा परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो. ई-सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. याचा परिणाम लगेच होत नाही, परंतु कालांतराने याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.
फुफ्फस कमकुवत असल्यास कोरोनाचा धोका अधिक

ई-सिगारेट धुम्रपान करण्यापेक्षा कमी प्राणघात आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु आता ई-सिगारेट आणि धुम्रपान यांचा संबंध कोरोनाशी जोडून पाहिले जात आहे. जर तुमची फुफ्फुसें आधीच कमकुवत झाली असतील तर कोरोनाचा अधिक धोका होऊ शकतो. मागील वर्षी ई-सिगारेटशी संबंधित काही प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये फुफ्फुसाच्या जीवघेण्या आजारांची प्रकरणे आहेत.