Coronavirus Home Isolation : होम आयसोलेशन संपवण्याची योग्य वेळ काय? तर नियमावलीत काय म्हंटलंय?, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. सध्या कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सौम्य लक्षणे असलेले अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतात. याची संख्याही मोठी आहे. पण हा आयसोलेशनचा कालावधी नेमका किती असावा हे काहींना माहितीही नसेल. मात्र, आज याची माहिती दिली जाणार आहे.

कोरोनातून बरे होण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो. कारण कोरोना व्हायरसची उष्मायन अवधी 5 ते 12 दिवस आहे. जर लक्षणे दिसल्यानंतर किमान 14 ते 17 दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आयसोलेशन कालावधी संपू शकतो. पण ज्या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांचा होम आयसोलेशन कालावधी 10 दिवसांत संपू शकतो. तसेच तुमचा क्वारंटाईन कालावधीही तुमच्या प्रकृती आणि तुमच्या आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

…तर हळूहळू थांबवू शकता आयसोलेशन कालावधी

जर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होत असेल आणि तुमच्यात कोणतीही लक्षणे नसतील तर तुम्ही हळूहळू आयसोलेशन कालावधी संपवू शकता. दोन निगेटिव्ह RT-PCR रिपोर्टच्या माध्यमातूनही तुम्ही कोरोनातून बरे झाल्याचे समजू शकते आणि तुम्ही तुमचा क्वारंटाईन कालावधी संपवू शकता.

6-7 दिवसांत व्हायरस मरतो

सध्या आयसोलेशनचा कालावधी 14 दिवसांचा आहे. मात्र, काही हलक्या प्रकरणात कोरोना व्हायरस साधारणपणे 6 ते 7 दिवसांत मरतो, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.