‘कोरोना’ व्हायरस ‘फ्ल्यू’पेक्षा 5 पट जास्त धोकादायक, संशोधनातून समोर आली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची लक्षण ही सामान्य फ्ल्यूसारखीच असतात. मात्र कोरोना फ्ल्यूच्या तुलनेत पाचपट जास्त धोकादायक आहे. विशेषत: प्रौढांसाठी जास्त धोकादायक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याची पुष्टी केली आहे आणि लोकांनी या विषाणूपासून स्वत:चे रक्षण आणि लोकांपासून दूर रहावे असे निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूवरील हे संशोधन हार्वर्ड विद्यापीठ आणि एमोरी विद्यापीठाच्या एका पथकाने केले आहे. पथकाच्या म्हणण्यानुसार सार्स कोविड 2 विषाणू हा फ्ल्यूचा आणखी एक प्रकार आहे, जो लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे.

मेच्या सुरुवातीस कोरोना विषाणूमुळे 65 हजार अमेरिकन नागरिक संक्रमित झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. हा आकडा अमेरिकेत दरवर्षी इन्फ्लूएन्झामुळे मरण पावणाऱ्या लोकांच्या संख्ये एवढाच आहे. असे असूनही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दोन विषाणूंची आपापसात तुनला केली जाऊ शकत नाही.
शास्त्रज्ञांच्या मते, कोरोना विषाणू हा एक अत्यंत संसर्गजन्य साथीचा रोग आहे आणि दुसरे म्हणजे, ज्या प्रकारे मृत्यू होत आहेत ते पूर्णपणे भिन्न आहेत. डायमंड प्रेझन्स क्रूझ शिपमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचा डेटा वापरून वैज्ञानिकांनी असा अंदाज लावला आहे की, यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 0.5 टक्के आहे. जे फ्ल्यूच्या मृत्यूपेक्षा पाचपट जास्त आहे.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि एमोरी युनिव्हर्सिटीच्या पथकाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेला साथीच्या संकटाचा ज्या प्रकारे सामना करावा लागाला आहे असे यापूर्वी कधीही झाले नाही. एन्फ्लुएन्झाच्या साथीच्या काळात देखील अमेरिकेला एवढे झगडावे लागले नव्हते. मात्रा, वैज्ञानिक आता हंगामी एन्फ्लूएन्झा आणि कोरोना विषाणूच्या मृत्यूची तुलना करून अचूक निष्कर्षापर्य़ंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जगभरातील लोक कोरोना विषाणूच्या संकटाशी झगडत आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनामुळे 4 लाख 23 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 75 लाख 97 हजारांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. अमेरिका हा जगातील सर्वाधिक बाधित देश आहे. या ठिकाणी कोरोनामुळे 1 लाख 16 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 लाख 89 हजारांहून अधिक लोक संक्रमित आहेत.