Coronavirus Oxford Vaccine : सुरूवातीच्या ट्रायलमध्ये सुरक्षित सिद्ध झाली ‘ऑक्सफर्ड’ची वॅक्सीन, जाणून घ्या कशी करते काम !

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड, एस्ट्राजेनेका कोविड-19 वॅक्सीनचे सुरूवातीचे परिणाम पॉझिटिव्ह येणे, कोरोना व्हायरस महामारीच्या विरूद्धचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. ही वॅक्सीन सुरूवातीच्या ट्रायलमध्ये सुरक्षित आणि इम्यूनिटी वाढवणारी आढळून आली आहे. 20 जुलैला मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, या ट्रायलमध्ये 1,077 लोक सहभागी झाले होते.

रिपोर्टनुसार, या वॅक्सीनवर पुढेही क्लिनिकल संशोधन झाले पाहिजे, ज्यामध्ये ज्येष्ठांवर सुद्धा या वॅक्सीनची ट्रायल केली पाहिजे. सध्या परिणामांमध्ये फोकस इम्यून रिस्पॉन्सवर होता. यापुढे सुद्धा परिक्षणाची गरज आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट व्हावे की, ही वॅक्सीन संसर्गाविरूद्ध संरक्षण करू शकते किंवा नाही.

कशी काम करते ऑक्सफर्ड कोविड-19 ची वॅक्सीन?
AZD1222 COVID-19 vaccine, ही ब्रिटनची बायोफार्मास्यूटिकल कंपनी AstraZeneca च्या सोबत ऑक्सफर्डच्या जेन्नर इन्स्टिट्यूटने विकसित केली होती. ही अगोदर ChAdOx1 nCoV-19 या नावाने ओळखली जात होती. ही एक्सप्रीमेंटल वॅक्सीन मे महिन्यात ट्रायल च्या दुसर्‍या/तिसर्‍या टप्प्यात पोहचली.

संशोधकांना आढळले की, कोविड-19ची एक्सप्रीमेंटल वॅक्सीन 18 ते 55 वर्ष वयाच्या लोकांमध्ये इम्यूनिटीला दुप्पट शक्तीशाली बनवते. विशेषकरून त्या लोकांना ज्यांना कोरोना व्हायरस संक्रमण किंवा त्याची लक्षणे कधी जाणवली नाहीत.

संशोधकांना आढळले की, वॅक्सीन शरीराच्या टी-कोशिकांमध्ये प्रतिक्रियेचे निमित्त सुद्धा बनते, जी कोरोना व्हायरसशी लढण्यास मदत करते. वाढत्या पुराव्यांवरून समजले की, अँटीबॉडीच्या सोबत एक टी-सेल प्रतिक्रिया, सार्स-कोव्ह -2 संक्रमणाला नियंत्रित करण्यात महत्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. तसेच वॅक्सीनेशच्या 14 दिवसांनंतर टी-पेशींचा स्तर खुप वाढला, तर अँटीबॉडीचा स्तर 28 दिवसांनंतर उच्च स्तरावर पोहचला.

ट्रायलचा हा निष्कर्ष खुपच आशादायक आहे, जो दाखवतो की, वॅक्सीन व्हायरसला ओळखू शकते आणि हल्ला करण्यासाठी प्रतिकारशक्तीला प्रशिक्षित करू शकते.