Coronavirus Prevention Tips : आयुर्वेदाचे ‘हे’ 10 उपाय करतील तुमची व्हायरसच्या प्रकोपासून ‘सुरक्षा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर लढा देत आहे. आतापर्यंत COVID-19 विषाणूमुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे. नियमित स्वच्छता आवश्यक आहे, विशेषत: हात धुणे. या सर्व गोष्टींसह, जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण इतरांपेक्षा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यास अधिक यशस्वी व्हाल. आयुर्वेदात बरेच उपाय आहेत, ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकता, तसेच आपले घर आणि आसपासच्या वातावरणास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावपासून मुक्त ठेवू शकता.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयुर्वेद डॉ. अजय सक्सेना यांनी काही सूचना दिल्या आहेत ज्याचे अनुसरण करून आपण आपले संरक्षण करू शकतो.

1. COVID-19 विषाणूचे परिणाम टाळण्यासाठी आपण नियमितपणे कोमट प्यावे हे सर्वात महत्वाचे आहे.

2. शरीराची प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही आवळा, कोरफड, गुळवेल , लिंबू इत्यादीचा रस नियमित प्रमाणात प्या.

3. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आपण पाण्यात तुळशीच्या रसचे काही थेंब टाकून पिऊ शकता.

4. गरम दुधात हळद मिसळल्याने प्रतिकारशक्ती सुधारते.

5. रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आप अष्टादसांग काढ़ा, गुडूच्यादि काढ़ा , अमृतउत्तरम काढ़ा आणि सिरिशादी काढ़ा यांचे सेवन करणे उत्तम राहील

6. घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नियमितपणे कडुलिंबाची पाने, गुग्गल, राळ, देवदार आणि दोन कापूर एकत्र जळावे. त्याचा धूर घर आणि परिसरात पसरू द्याया सर्वा व्यतिरिक्त आपण कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले पाहिजे.

7. या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा असेल तर गुग्गल, वाच, वेलची, तुळशी, लवंग, गाईचे तूप आणि खंद मातीच्या भांड्यात टाकावेत आणि घरात आणि परिसरात त्याचा धूर पसरू द्या.

8. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण नियमितपणे तुळशीची पाने, 4 काळी मिरी, 3 लवंगा, आल्याचा रस याचा काढा करून एक चमचा मधा सह घेऊ शकता.

9. जर आपल्याला चहा पिण्याची आवड असेल तर आपण नियमितपणे 10 किंवा 15 तुळशीची पाने, 5 ते 7 काळी मिरी, थोडी दालचिनी आणि योग्य प्रमाणात आले घालून बनविलेले चहा पिणे आवश्यक आहे. हे आपल्याला रोगापासून बचाव करण्यास मदत करेल.

10. या सर्वा व्यतिरिक्त आपण कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले पाहिजे.