Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Coronavirus Vaccination : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या आणि अतिशय धोकादायक लाटेनंतर देशात कोविड-19 ची प्रकरणे आता कमी होताना दिसत आहेत. हे पाहता हेल्थ वर्कर्स आणि सरकार नागरिकांना कोविड-19 व्हॅक्सीन लवकरात लवकर घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. याच दरम्यान असे अनेक रिपोर्टसुद्धा आहेत, जे सांगतात की, कोरोना व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर काय केले पाहिजे. व्हॅक्सीन घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी, हात दुखणे ही सामान्य बाब आहे. हेल्थ एक्सपर्टने व्हॅक्सीनच्या नंतर ताप आल्यास काही औषधे घेण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे.

आता व्हॅक्सीनच्या साईड इफेक्ट्सपासून काही प्रमाणात आराम देण्यासाठी एक्सपर्टने नवीन पद्धती शोधल्या आहेत. त्यांनी खाण्यात काही अशा गोष्टींचा समावेश करण्यास सांगितला आहे ज्यामुळे साईड-इफेक्ट्समध्ये आराम मिळू शकतो.

Pimpri-Chinchwad Lockdown : पिंपरीत ‘या’ गोष्टी वगळता सर्व दुकाने खुली होणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु

 

नारळपाणी
मोतीलाल नेहरू डिव्हिजनल हॉस्पीटलच्या फिजीशियन डॉ. सुषमा मोतीलाल लोकांना सल्ला देत आहेत की, जर व्हॅक्सीननंतर ताप येत असेल तर त्यांनी नारळपाणी प्यावे. नारळपाणी ब्लड प्रेशर कंट्रोल करते आणि शरीर हाइड्रेटसुद्धा करते.

डॉ. मनसूर अहमद सविस्तर सांगतात की, नारळपाण्यात दूधापेक्षा जास्त पोषकतत्व असतात आणि यामध्ये दूधाप्रमाणे वसा किंवा कॉलेस्ट्रोल सुद्धा नसते. नारळपाण्यात अँटी-ऑक्सीडेंट्स गुण असतात, जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि फॉस्फोरस, जे सलाईन ग्लूकोजचा चांगला पर्याय आहे.

बेली हॉस्पिटलचे डॉ. अखौरी यांनी सांगितले की, नारळपाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून शरीर डिटॉक्स करते.

लिंबू पाणी
हेल्थ एक्सपर्टने सुद्धा सल्ला दिला आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कोविड-19 व्हॅक्सीनच्या साइड-इफेक्ट्सचा त्रास होत असेल तर त्यास दिवसात एक ते दोन वेळा लिंबू पाणी द्यावे. यामुळे आराम मिळतो.

शरीर हायड्रेट ठेवा
हेल्थ एक्सपर्टनुसार, व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर लोकांनी स्वताला हायड्रेट ठेवले पाहिजे. महिलांनी किमान 2.7 लीटर म्हणजे 11 ग्लास पाणी प्यायले पाहिजे आणि पुरुषांनी 3.7 लीटर म्हणजे 15 लीटर पाणी आवश्यक प्यायले पाहिजे. याशिवाय व्हॅक्सीनच्या अगोदर आणि नंतर रोज नारळपाणी प्यायल्याने अतिसार किंवा मांसपेशीच्या वेदनांपासून बचाव होऊ शकतो.

READ ALSO THIS :

Not OUT 100 : वृद्ध दाम्पत्यांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा, घरीच उपचार घेऊन अवघ्या 12 दिवसात केली मात

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी ‘या’ कारणामुळं वाढणार ?

नवाब मलिकांचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘7 वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही’

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यावर गोळीबार, फायरिंगच्या घटनेने प्रचंड खळबळ