Coronavirus Wave : रिसर्चमध्ये खुलासा ! 10 महिन्यापर्यंत कोविड-19 संसर्गापासून वाचवू शकते इम्यूनिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोविड-19 (covid-19) च्या दुसर्‍या लाटेने भारताला जास्त त्रस्त केले. आता लोकांना तिसर्‍या लाटेची शक्यता भीती दाखवत आहे, या दरम्यान शास्त्रज्ञामध्ये याबाबत चर्चा होत आहे की, जर एक व्यक्ती, जी व्हायरसने संक्रमित होऊन गेली आहे, तिच्या शरीरात इम्युनिटी मोठ्या कालावधीसाठी विकसित होते का किंवा पुन्हा संसर्गाचा धोका असतो.

कोविडने covid-19 दुसर्‍यांदा संक्रमित होण्याचा अर्थ काय?
जेव्हा कुणी व्यक्ती एखाद्या आजाराने संक्रमित होतो आणि पुन्हा बरे झाल्यानंतर पुन्हा त्याच आजाराने व्यक्ती ग्रस्त होतो, तेव्हा यास दुसर्‍यांदा संक्रमित होणे म्हणतात. व्हायरस विविध कारणांमुळे पुन:संसर्गाचे कारण बनू शकतो.

मात्र, जेव्हा कोविडने पुन:संसर्गाची गोष्ट येते तेव्हा, शास्त्रज्ञ अजूनपर्यंत कोणत्याही ठोस निष्कर्षावर पोहचलेले नाहीत. आयसीएमआरच्या एका संशोधनानुसार, रि-इन्फेक्शन तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती 102 दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या वेळी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळते.

कोविड-19 covid-19 रूग्णांमध्ये पुन:संसर्ग शक्यत आहे का?
आयसीएमआरद्वारे करण्यात आलेल्या पहिल्या एका शोधात 1300 प्रकरणांपैकी 58 किंवा 4.5% प्रकरणे पुन:संसर्गाची आढळली होती. या 58 प्रकरणांमध्ये 102 दिवसांच्या अंतराने लोकांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. मात्र, या विषयावर जास्त संशोधनाची आवश्यकता आहे.

कोविड इम्युनिटी किती काळ राहते ?
विविध संशोधनामध्ये आढळून आले आहे की जे लोक कोविड-19 मधून रिकव्हर होतात, त्यांच्यात एक निश्चित वेळेसाठी सार्स-कोव्ह-2 व्हायरसच्या प्रति प्रतिकारशक्ती विकसित होते. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या केस स्टडीजने स्पष्ट केले की, जर तो पुन्हा समोर आला, तर आजारातून वाचणे आणि त्याच्या गंभीरतेला कमी करण्यासाठी प्रतिकारशक्ती पेशी आणि प्रोटीन, विषाणूंना ओळखणे आणि मारायला शिकतात. परंतु, इम्यूनिटी किती काळ राहते हा एक मोठा प्रश्न आहे.

कोविड-19 covid-19 महामारीसाठी जबाबदार सार्स-सीओव्ही-2 व्हायरसने पहिल्यांदा संक्रमित झाल्यानंतर पुढील 10 महिन्यांपर्यंत या आजाराने पुन्हा संक्रमित होण्याचा धोका खुप कमी होतो. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

जर्नल लान्सेट हेल्दी लाँगेव्हिटीमध्ये प्रकाशित एका संशोधनात मागील वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी फेब्रुवारीदरम्यान इंग्लंडमध्ये केयर होममध्ये राहणार्‍या 2000 पेक्षा जास्त लोकांवर आणि कर्मचार्‍यांवर कोविड-19 संसर्गाचा दर पाहिला गेला. ब्रिटन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांनी अँटीबॉडी चाचणीद्वारे 10 महिन्यांपूर्वी संसर्ग झालेल्या लोकांची तुलना त्या लोकांशी केली ज्यांना अगोदर कोविड संसर्ग झाला नव्हता.

यूसीएलचे इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्समध्ये संशोधनाच्या मुख्य लेखिका मारिया क्रुतिकोव्ह यांनी म्हटले, ही खरंच चांगली बातमी आहे की, नैसर्गिक संसर्ग या कालावधीत पुन्हा संक्रमित होण्याच्या विरूद्ध सुरक्षा प्रदान करतो. दोन वेळा संक्रमित होण्याचा धोका अतिशय कमी दिसून येतो.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’