Coronavirus : ‘कोरोना’ झालेल्यांना ‘थायरॉइड’चा धोका, रिसर्चमधून दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातले असून अद्यापही लसीची निर्मिती झाली नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना व्हायरस सार्स-सीओवी-2चे विषाणू श्वसनातून शरीरात प्रवेश करत असल्यामुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासोबतच इतरही लक्षण या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत.

इटलीमधील पिसा युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयातील एका अभ्यासातून कोरोना झालेल्या व्यक्तीला थायरॉईड आजार झाल्याची ही पहिलीच केस उघड झाली आहे. 21 फेब्रुवारीला रुग्णालयात 18 वर्षांच्या तरुणीची तपासणी करण्यात आली होती. संबंधित तरुणीच्या वडिलांना कोरोना झाला होता. वडिलांचा संसर्ग तरुणीला झाल्याने तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांनंतर 14 मार्च रोजी महिलेची तपासणी केली गेली तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केली त्यावेळी ब्लडप्रेशरही खूप वाढले होते. महिलेच्या सर्व चाचण्या पुन्हा करण्यात आल्या त्यावेळी या महिलेला थायरॉइड झाल्याचे निदान झाले. याआधी एक महिन्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये महिलेला हा आजार नव्हता. कोरोनाच्या संक्रमणानंतर महिलेला सबअक्यूट थायराइडिटिस आजार झाल्याचे रिेपोर्टनंतर दिसून आले. महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.