Coronavirus Vaccine : कोरोनातून बरे झाल्याच्या 4 आठवड्यानंतरच लस घ्या; केंद्र सरकारकडून संदेश जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोरोना लसीकरणाबाबत गाईडलाईन्सही जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर चार आठवड्यानंतर लस द्यावी, असे भारत सरकारने जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने भारत सरकारचा हवाला देताना या गोष्टी सांगितल्या आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी ट्विट करून संदेश दिला आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण 4 आठवड्यानंतर लस घेऊ शकतात, असे यामध्ये म्हटले आहे.

WHO आणि CDCP नुसार…

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनची शिफारस आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यक्तीने लस घेणे गरजेचे आहे. तर जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते, की संबंधित व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे. कारण मानवी शरीरात नैसर्गिकपणे अँटिबॉडीज तयार राहते. जे सामान्यपणे एक ते तीन महिन्यांपर्यंत होत असते. भारतात सर्वाधिक डॉक्टर्स बरे झाल्यानंतर आणि लसीकरणादरम्यान शिफारस करतात.

का घ्यावी चार आठवड्यानंतर लस?

कोरोनातून बरे झाल्यानंतर चार आठवड्यानंतर लस घेतल्याने इम्युन रिस्पॉन्स चांगला असतो. कोरोनानंतर शरीरात अँटीबॉडी बनते ती 4-6 आठवड्यांपर्यंत शरीरात राहते, असे मानले जाते. कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात संक्रमण प्रतिक्रिया सुरु असते. त्यामुळे लस घेणे धोकादायक ठरू शकते. बरे झाल्यानंतर नैसर्गिकरित्या इम्यूनिटी बनते आणि ते अधिक वाढण्यासाठी लस दिली जाते.