Covid Somnia Cure : तुम्हाला कोरोना सोमनियाची समस्या तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा परिणाम शरीरासह मनावर सुद्धा होत आहे. कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना सर्वात मोठी समस्या सतावत आहे ती म्हणजे झोप कमी होणे. रूग्णांच्या या स्थितीला कोरोना सोमनियाचे(Corona Somania) नाव दिले आहे. कोरोना सोमनिया(Corona Somania) शब्द निद्रानाशाचे मुद्दे आणि कोरोना व्हायरसमुळे झोपेची समस्या दर्शवतो. कोरोना सोमनिया होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार जाणून घेवूयात…

ही आहेत कारणे

1 कोविड-19 संसर्गाला तोंड देण्यासंदर्भात जाणवणारी असुरक्षितात आणि भीती.

2 कुटुंबियांना सुरक्षित करण्याच्या चिंतेने मेंदूवर दबाव पडतो.

3 सोशल डिस्टन्सिंगची स्थिती.

4 आयसोलेशन आणि भीती सर्व मिळून तणाव वाढणे.

कोरोना सोमनियापासून असा करा बचाव :

* डेली रूटीनमध्ये बदल करा, दिवसा झोपू नका.

* लॉकडाऊनमुळे शारीरीक हालचाली कमी झाल्या आहेत, यासाठी घरातच वॉक करा.

* ऑनलाइन काम करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने ब्रेक घ्या. स्क्रीनवर जास्त वेळ नजर ठेवू नका.

* ताप आणि चवीची कमतरता सुद्धा एखाद्याला जागे ठेवू शकते. आवडीनुसार पौष्टिक आहार सेवन करा.

* शारीरिक क्षमतेनुसार एक्सरसाइज करा.

* चांगला आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, फायबर युक्त जेवण घ्या.

* बातम्या आणि सोशल मीडियापासून दूर रहा. मोबाइल दूर ठेवा.

* डेली रूटीनमध्ये म्यूझिक, कला, रिडिंगचा समावेश करा.