Covid Testing Guidelines : ICMR ने जारी केली RT-PCR टेस्टसाठी 5 नवीन मार्गदर्शक तत्त्वे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने कोविड -19 चाचणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कारण प्रयोगशाळांना अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्या वेगाने देशात कोरोना संक्रमित लोकांचे आकडे वाढत आहेत, त्यामुळे अशा लॅबवरील भार खुपच जास्त वाढला आहे.

आयसीएमआरची टेस्टिंगबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे :

1. आरटी-पीसीआर टेस्ट कोणत्याही अशा व्यक्तीवर पुन्हा करू नये, जी रॅपिड-अँटिजन टेस्ट किंवा आरटी-पीसीआरद्वारे एकदा पॉझिटिव्ह आढळली आहे.

2. कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर डिस्चार्जसाठी पुन्हा टेस्ट करण्याची आवश्यकता नाही

3. प्रवासासाठी निरोगी व्यक्तींसाठी टेस्टची आवश्यकता बंद केली पाहिजे.

4. ज्या लोकांना प्रवास करायचा आहे, त्यांना कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

5. राज्यांनी मोबाइल चाचणी प्रणालींना प्रोत्साहन दिले पाहिजे.