Covid-19 & Obesity : लठ्ठपणा बनवू शकतो कोरोनाला आणखी धोकादायक, ‘ही’ 10 कारणे जाणून घ्या ताबडतोब कमी करा वजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सामान्यपणे कोविड संसर्गाचा रूग्ण दोन आठवड्यात बरा होतो, परंतु तुम्ही लठ्ठपणाने ग्रस्त असाल तर तुम्हाला उपचार आणि रिकव्हरीत जास्त अडचणी येऊ शकतात. तसेच लठ्ठ व्यक्तींना ऑक्सजीनची कमतरता झाल्यास हायर व्हेंटिलेशन प्रेशरची आवश्यकता भासते.

लठ्ठपणा का बनतो धोकादायक

–  लठ्ठपणामुळे अब्डोमन प्रेशरमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते.

– लठ्ठपणामुळे फुफ्फुस आकुंचित होतात, व्यवस्थित काम करू शकत नाहीत.

–  कोरोनाच्या इतर रूग्णांच्या तुलनेत लठ्ठ रूग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता जास्त भासू शकते.

–  जर शरीरात ऑक्सीजनचा स्तर कमी होऊ लागला तर लठ्ठ व्यक्तीसाठी प्रोनिंग सुद्धा शक्य होत नाही.

–  जे लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत त्यांना कोरोनाच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा वेळ लागतो.

–  लठ्ठपणामुळे इम्युनिटी स्लीप अ‍ॅपनिया सुद्धा अशा लोकांमध्ये ऑक्सीजन सॅच्युरेशनचा स्तर कमी ठेवतो.

–  शरीरात फॅट असेल तर त्यामुळे सूज लवकर येते.

–  लठ्ठ लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे संसर्ग लवकर होतो.

वजन कमी करणे आवश्यक

लठ्ठ व्यक्तींनी आपल्या जीवनशैलीत लवकर बदल करावेत. रोज वर्कआऊटसह डाएटमध्ये सुद्धा बदल करावेत. रोज 30 मिनिटे चाला आणि नंतर कार्डियो वर्कआऊट करा. तळलेले-भाजलेले खाऊ नका. जास्तीत जास्त फळे आणि सीझनल भाज्या सेवन करा. शक्य असल्यास एखाद्या डाएटेशियनकडून डाएट चार्ट बनवून त्याचे पालन करा.