Covid-19 Or Taste Relation : चव घेण्याची क्षमता ‘प्रभावित’ करत नाही कोविड-19 : रिसर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-19 चव घेण्याच्या क्षमतेशी संबंधीत पेशींचे थेट नुकसान करत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासातून समजले की, वास आणि चव जाणे याचा संबंध संसर्गामुळे येणार्‍या सूजेशी आहे.

अभ्यासातील हे निष्कर्ष अगोदरच्या अभ्यासाच्या विरूद्ध आहेत, ज्यामध्ये चव घेण्याची क्षमता थेट व्हायरसच्या कणांमुळे प्रभावित होते असे म्हटले आहे. कोविड-19 च्या अनेक रूग्णांची वास आणि चव घेण्याची क्षमता तात्पूरती नष्ट होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या लक्षणाला कोविड-19 च्या वाढत्या लक्षणांच्या यादीत समाविष्ठ केले आहे.

अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या सह प्राध्यापक, होंगजियांग लियू यांनी म्हटले की, व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर काही दिवसानंतर चव येत नसल्याचे लक्षण वाढत चालले असल्याने हा विषय चिंतेचा झाला आहे. लियू यांनी म्हटले, आपल्याला याबाबत अतिशय सतर्क राहावे लागेल.

अभ्यासात हे देखील आढळले की, चव घेण्याच्या क्षमतेशी संबंधीत पेशी सार्स-सीओव्ही-2 संक्रमणाच्या बाबतीत संवेदनशील नाहीत, कारण त्यामधील बहुतांशमध्ये एसीई2 (एक प्रकारचे एंजाइम जे हृदय, आतड्या, पेशी, धमण्या इत्यादींशी संबंधीत आहे.) नसतात, हा तो रस्ता आहे जेथून व्हायरस शरीरात प्रवेश करतात. लियू यांनी म्हटले हा पहिला अभ्यास नाही, ज्यात तोंडात एसीई2 ची उपस्थिती आढळली आहे.

त्या म्हणाल्या, परंतु हा कोरोना व्हायरस आणि चव संबंधी पेशी सुरक्षित राहण्याशी संबंधीत खास माहिती देणारा पहिला अभ्यास आहे, की यासाठी इतर पेशींचे काम न करणे जबाबदार आहे. हा अभ्यास एसीएस फार्माकोलॉजी अँड ट्रान्सलेशनल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.