बराच वेळ ‘लघवी’ थांबवून ठेवल्यास आरोग्याचे होते नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आरोग्याबाबत बरीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मग ते आपल्या खाण्याशी किंवा आपल्या इतर सवयींशी संबंधित असो. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. कारण काहीही असो, मात्र ते आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. कधीकधी जास्त कामामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला युरीन बराच वेळ थांबून ठेवावे लागते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यूरिन शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकते. जर आपल्याला वॉशरूममध्ये जाण्याची आवश्यकता भासल्यानंतरही आपण बराच वेळ जात नाही आणि युरीन थांबून ठेवता तर शरीरातील हानिकारक पदार्थांमुळे संसर्ग किंवा आजाराचा धोका असतो. म्हणजेच, बराच काळ लघवी थांबविण्यामुळे यूरिनरी ट्रेक्ट इंफेक्शन किंवा मूत्र मार्गात संसर्गाचा धोका वाढतो.

जे लोक सतत लघवी (यूरीन) थांबवून ठेवतात त्यांना मूत्रपिंड किंवा मूत्राशयात वेदना उद्भवू शकतात. जेव्हा आपल्याला वॉशरूममध्ये जाण्याची आवश्यकता भासते तेव्हा हे स्पष्ट आहे की आपले मूत्राशय भरलेले आहे. अशा परिस्थितीत मूत्राशयावर दबाव वाढू शकतो. जेव्हा आपण बर्‍याच वेळाने वॉशरूममध्ये जाता, तेव्हा ते वेदनादायक होऊ शकते. बराच वेळ यूरीन थांबवून ठेवल्याने मूत्रपिंडाचे कार्य विस्कळीत होते. तसेच मूत्राशयात सूजही येऊ शकते. त्याच वेळी, मूत्रपिंडाशी संबंधित इतर अवयवांवर देखील परिणाम होऊ शकतो.

वारंवार लघवी थांबवून ठेवल्याने लघविशी संबंधित अनेक आजारही उद्भवू शकतात. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे. तसेच याचा आपल्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. आजकाल मूत्रपिंडातील समस्या सामान्य आहेत. जर आपण लघवी थांबविली तर किडनी स्टोन होण्याचा धोका आहे. सतत युरीन थांबवून ठेवल्याने मूत्राशयाचा आकार वाढू शकतो. वेळेवर वॉशरूमला न गेल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात, जे मूत्राशयाच्या आत पोहोचू शकतात. अशी संसर्ग उद्भवू शकते आणि बर्‍याच गंभीर आजारांचा विकास होऊ शकतो.