Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Health Department Exam Scam Case | राज्यात परीक्षांचा नुसता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET exam) घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यानंतर परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरेसह (Sukhdev Dere) तीन जणांना अटक केली. याप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला (Health Department Exam Scam Case) नवंच वळण लागलं आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यात भाजपच्या (BJP) युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप (Sanjay Sanap) याला पोलिसांनी अटक (Arrested) केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पेपर फुटी प्रकरणामध्ये (Health Department Exam Scam Case) बीड जिल्ह्यात याआगोदरच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचं निदर्शनास आले.

दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी सानप यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे.
तो बीड शहरात राहतो त्याचा मोठा बंगला आहे. संजय सानपच्या अटकेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असल्याचं दिसतं.

 

Web Title :- Health Department Exam Scam Case | bjp activist Sanjay Sanap arrested in health department examination paper leak case
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Munmun Dutta Dance Video | ‘बबिता’जीचा डान्स बघून जेठालाल सुद्धा होईल थक्क, पाहा व्हायरल व्हिडिओ

Smartphone Dangerous App | तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे का हे धोकादायक अ‍ॅप! तुमचे अकाऊंट करू शकते रिकामे, तात्काळ करा डिलिट

 

Monalisa Bold Photos | मोनालिसा शॉर्ट्समधील बोल्ड अंदाजानं झाली सोशल मीडियावर ट्रोल.. नेटकऱ्यांनी दिल्या चांगल्याच शिव्या

Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का?

 

Urfi Javed Skirt Viral Photo | रिव्हिलिंग स्कर्टमधील फोटोमुळं उर्फी जावेद झाली सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘तुझ्याकडे कपडे नाही का? नेहमीच अर्धवट कपडे घालते’