Health Department Recruitment | तरुणांना नोकरीची संधी, आरोग्य विभागातील 10 हजार पदांसाठी भरती करण्याची राज्य सरकारची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Health Department Recruitment | नोकरीच्या शोधात असलेल्या तरूण-तरूणींसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने (State Government) आरोग्य विभागात 10 हजार पदांवर भरती (Health Department Recruitment) करण्याची घोषणा केली आहे. साडेतीन वर्षापासून ही नोकरी भरती खोळंबली होती. आता राज्य सरकारने आरोग्य विभागातील रिक्त 10 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येणार आहेत.

 

असे आहे भरतीचे वेळापत्रक
1 जानेवारी ते 7 जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
25 जानेवारी ते 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
25 मार्च आणि 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
27 मार्च ते 27 एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड

 

आरोग्य विभागात हजारो जागा रिक्त (Health Department Recruitment) असून मागच्या वेळी झालेल्या गैरप्रकारांमुळे ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. यामुळे साडे अकरा लाख उमेदवारांशी निराशा झाली होती. परीक्षा शुल्क भरूनही भरती न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती, असे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले.

 

Web Title :- Health Department Recruitment | 10 thousand posts will be recruited in the health department a big announcement by the state government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ईडीला कार्टाने झापले! संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?

Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा