‘डायबिटीज’च्या रुग्णांनी दररोज ‘या’ गोष्टींचं सेवन करावं, ब्लड शुगर नियंत्रित राहील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आंतरराष्ट्रीय मधुमेह असोसिएशनच्या अहवालानुसार जगभरात 42 कोटींहूनही अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. तसेच, 2045 पर्यंत रुग्णांची संख्या 62 कोटींवर पोहोचू शकते, तर भारतात रुग्णांची संख्या जवळपास 8 कोटींवर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत डायबिटीजच्या आजाराची राजधानी आहे. या आजारात रक्तातील साखरेची पातळी वाढते. तसेच स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन येणे थांबते. डायबिटीजमध्ये गोड खाण्यास मनाई असते. तसेच, आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. डॉक्टर नेहमीच डायबिटीजच्या रुग्णांना औषधे टाळण्याचा सल्ला देतात. आपणदेखील डायबिटीजचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू इच्छित असाल दररोज या गोष्टींचे सेवन करा. यांच्या सेवनामुळे आपण लवकरच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. त्याबाबत जाणून घेऊया…

कढीपत्त्याचे सेवन करा

कढीपत्त्याची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधासमान असतात. त्यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यासाठी दिवसातून दोनदा कढीपत्त्याचे सेवन करावे.

पेरूच्या पानांचे आणि जिऱ्याचे सेवन करा

पेरूची पानेदेखील डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. यासाठी काही पेरूची पाने व तीन ग्रॅम जिरे एक ग्लास पाण्यात उकळवा. जेव्हा पाणी अर्धा ग्लास इतके शिल्लक राहील, तेव्हा ते थंड करून त्याचे सेवन करा. याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

पाणी प्यावे

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यावे. यानंतर अर्धा तास पायी चालावे.

लसणाचे सेवन करावे

जर आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन करावे. यासाठी दररोज सकाळी पाणी पिण्यापूर्वी लसणाच्या दोन कांड्या खाव्यात.

दालचिनीचे सेवन करावे

डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी दालचिनी ही वरदान मानली जाते. यासाठी तीन चमचे दालचिनी पावडर एक लिटर पाण्यात 20 मिनिटांपर्यंत उकळवा. त्यानंतर हे पाणी दिवसभर थोडे थोडे पीत राहावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.