मधुमेहच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी आवश्य खावे Ivy Gourd

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तोंडलीचा वेल उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळतो. ही एक वेल असून त्यास तोंडली हे फळ येते. याची भाजी महाराष्ट्रात सर्रास बनवली जाते. याची मोठ्याप्रमाणात शेती केली जाते. कच्ची तोंडली हिरव्या रंगाची असतात. तर पिकल्यावर ती लाल होतात. आरोग्यासाठी ही भाजी लाभदायक आहे. वजन कमी करण्यासह मधुमेह आणि मुतखड्याच्या समस्येत आराम मिळतो.

तज्ज्ञ सांगतात तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे डॉक्टर्स लठ्ठपणा कमी करण्यासाठी तोंडली खाण्याचा सल्ला देतात. अनेक शोधांमध्ये खुलासा झाला आहे की, तोंडली सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रित होते. यासाठी डाएटमध्ये याचा समावेश आवश्य करा. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

श्रीलंकेत तोंडलीचा खप सर्वात जास्त आहे. लोक शतकांपासून तोंडलीचे सेवन करत आहेत. यासाठी तोंडलीवर अनेक संशोधन झाली आहेत. या संशोधनातून खुलासा झाला आहे की, तोंडलीमध्ये अँटी-डायबेटिक गुण आढळतात. याच्या सेवनाने इन्स्टंट ब्लड शुगर कंट्रोल होते.

तर, जर्नल ऑफ डायबिटीज रिसर्चमध्ये प्रसिद्ध संशोधनात मधुमेहाच्या रूग्णांना तोंडली खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संशोधनानुसार, डाएटमध्ये तोंडलीचा समावेश करणार्‍या लोकांमध्ये शुगरचा स्तर कमी आढळला. तर, डायबिटीज केयरच्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, तोंडली शुगर कंट्रोल करण्यात उपयोगी ठरते. मधुमेहाच्या रूग्णांनी तोंडलीचे सेवन रोज केले पाहिजे.