Diet for Healthy Eyes : डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर ‘या’ 5 वस्तूंचा करा आहारात समावेश

नवी दिल्ली : डिजिटलायजेशनच्या या काळात आपला जास्तीत जास्त वेळ टीव्ही, मोबाईल आणि कम्प्युटरच्या समोर जातो. यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. लवकर चष्मा लागतो. जर तुम्हाला आपले डोळे दिर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर आपल्या डाएटमध्ये त्या वस्तू सहभागी करा ज्या दृष्टी मजबूत करतील आणि डोळ्यांना आराम मिळेल.

जास्तवेळ स्क्रीन पाहू नका :
टीव्ही, मोबाईल, कंम्प्यूटरची स्क्रीन सतत पहात राहिल्याने डोळ्यांचे नुकसान होते. नजर अस्पष्ट होते, दूरच्या गोष्टी दिसत नाहीत, डोळे कोरडे होतात.

मासे सेवन करा :
माशांमध्ये ओमेग-3 फॅटी अ‍ॅसिड असते जे डोळ्यांसाठी चांगले आहे. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा दूर होतो. यासाठी मासे सेवन करा.

हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्या सेवन करणे डोळ्यांसाठी चांगले आहे. जसे की पालकमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन भरपूर असते, जे दृष्टी वाढवण्यास उपयोगी आहे.

ड्रायफ्रुट :
ड्रायफ्रुट डोळ्यांच्या आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. यामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड असते जे डोळ्यांसाठी उपयोगी आहे.

गाजरचे सेवन करा :
गाजर डोळ्यांसाठी लाभदायक आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे दृष्टी मजबूत होते.

बियांचे करा सेवन :
चिया बी, जूटचे बी, भांगचे बी डोळ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे.