Coronavirus Protection MISTAKES : कोरोनापासून वाचण्यासाठी करू नका ‘या’ चूका, होऊ शकतात इतर समस्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना जाता-जाता सुद्धा शरीरात खुप काही बिघडवून जातो. रिपोर्ट निगेटिव्ह झाल्यानंतर सुद्धा लोकांना बरे वाटत नाही. कुणाला थकवा, कुणाला ब्रेन फॉग तर कुणाला खोकल्याची समस्या कायम राहते. कुणी वास येत नसल्याने अस्वस्थ आहे तर कुणी गॅसमुळे. अशावेळी व्यक्तीला सतत वाटते की, तो अजूनही आजारी आहे परंतु असे नाही. हे आजार पोस्ट कोविड सिमटम्स आहेत. जे हळुहळु जातात. त्यामुळे अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. आपल्या आहाराकडे लक्ष द्या, काही काळानंतर ठिक व्हाल.

असे म्हटले जाते की, काही गाष्टींचा अतिरेक केल्यास नुकसान होऊ शकते. काही लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी काही गोष्टींचा इतका अतिरेक केला आहे की, यामुळे आजारी पडले आहेत. या चुका कोणत्या ते जाणून घ्या…

1. दिवसात सतत काढा प्यायल्याने गॅस आणि पाईल्सची समस्या वाढत आहे. यासाठी एक किंवा दोन वेळाच काढा प्या.

2. व्हिटॅमिन सी असलेल्या आंबट वस्तूंमध्ये स्कॉर्बिक अ‍ॅसिड जास्त असते. जे जास्त प्रमाणात घेतल्याने पोटाच्या समस्या वाढतात. पचनशक्ती कमी होणे, पोटात गडबड, अतिसारची समस्या होऊ शकते. अशावेळी लिंबू, संत्रे सारख्या गोष्टी संतुलित प्रमाणात सेवन करा.

3. कोरोनामुळे नाकाच्या ऑलफॅकटरी नर्व्हवर इफेक्ट होते. यामुळे लोकांना वास येत नाही. ही नर्व्ह आपोआप बरी होते. पण यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वास घेत राहिल्यास इतर आजार होऊ शकतात.

4. नाकात लिंबू रस सुद्धा टाकू नका. यामुळे त्रास आणखी वाढू शकतो.

5. वारंवार वाफ घेतल्याने नाकाचे इतर आजार सुद्धा होऊ शकतात. वाफ केवळ एक ते दोन वेळा घ्या.