Covid Vaccine Side Effects : कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर दिसले हे साईड-इफेक्ट्स, तर करू नका दुर्लक्ष !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना लोक करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्हॅक्सीन अभियान सर्वत्र सुरू आहे. मात्र अजूनही अनेक लोक व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्ला घाबरत आहेत. तर मेडिकल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सामान्यपणे व्हॅक्सीनचे साईड-इफेक्ट्स होतात, आणि हे सर्व आरोग्यासाठी वाईट नाहीत. हे साईड-इफेक्ट म्हणजे तुमची इम्यून सिस्टम व्हायरसशी लढण्यास तयार होत असल्याचा संकेत आहे.

हे आहे सामान्य साईड-इफेक्ट्स
ताप :
व्हॅक्सीन घेतल्यानंतर काही तासानंतर किंवा दुसर्‍या दिवशी ताप येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करू शकता. दुसर्‍या दिवशी हा ताप जातो.

हातात वेदना :
हातावर ज्या ठिकाणी इंजेक्शन घेतले आहे, तिथे वेदना होतात. काहीवेळा त्वचा लालसर होते. या वेदना आपोआप बंद होतात.

अंगदुखी :
मांसपेशी आणि सांध्यात कमी तीव्रतेचे दुखणे ही सामान्य प्रतिक्रिया आहे.

डोकेदुखी :
डोकेदुखीचा सुद्धा अर्थ हा आहे की, शरीर व्हायरसविरूद्ध तयार होत आहे.

थकवा :
व्हॅक्सीन शॉट घेतल्यानंतर थकवा सामान्य लक्षण आहे. याचा अर्थ शरीर व्हायरसपासून बचाव करत आहे.

या साईड-इफेक्टकडे दुर्लक्ष करू नका
* त्वचेवर रॅशेज म्हणजे चट्टे आले तर दुर्लक्ष करू नका. एक्सपर्टनुसार त्वचेवर चट्टे येणे किंवा लाल होणे व्हॅक्सीनचा सामान्य साईड-इफेक्ट आवश्य आहे, परंतु अनेकदा यास एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
* चट्टे त्या लोकांमध्ये सामान्य आहे, ज्यांना एखादी अ‍ॅलर्जी आहे, किंवा त्वचा नाजूक आहे. मात्र, चट्टे दिसताच ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
* याशिवाय सूज, ब्लिडिंग, बेशुद्धीत बोलणे किंवा बेशुद्ध होण्याकडे दुर्लक्ष करू नका ताबडतोब मेडिकल एक्सपर्टकडे संपर्क साधा.