तुम्हाला माहित आहे का ! तुमच्या आसपास ‘कोरोना’चे किती आहेत रुग्ण ? तर आजच डाउनलोड करा ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. देश आणि जगातील सरकार या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सध्या देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे या आजाराच्या रुग्णांची ओळख पटविणे. या आजाराची भीती लोकांमध्ये इतकी वाढली आहे की, फ्लूची लक्षणे दर्शविल्यानंतरही लोक रुग्णालयात कोरोना चाचणी घेण्यासाठी जात आहे.

अशा परिस्थितीत आजारी लोकांच्या आसपास राहणाऱ्यांना सर्वात मोठी भिती आहे. हा रोग लपविल्यामुळे हा विषाणू देशात झपाट्याने पसरत आहे. कोरोनाबाबत, सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि हा रोग सामान्य लोकांमध्ये पसरू नये यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

या आजाराने ग्रस्त रूग्णांना ओळखण्यासाठी सरकारने Aarogya setu app सुरू केले आहे, जे तुमच्या आसपास असलेल्या कोरोना ग्रस्त रूग्णांची ओळख पटवून आपणास बचावासाठी सतर्क करेल. हा अ‍ॅप आपल्याला सांगेल की, आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यामुळे सुरक्षित नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीपासून आपण अंतर ठेवू शकता. हा अ‍ॅप संक्रमित व्यक्तीला कसा ओळखेल ते जाणून घ्या-

हा अ‍ॅप डिव्हाइस युजर्सच्या डेटाला एनक्रिप्टेड स्वरूपात घेतो. जर आपण 6 फूटच्या अंतरामध्ये एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले तर हा अॅप युजर्सला नोटिफिकेशन पाठवते. ज्यामुळे कळते की, तुम्ही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहे की नाही. याव्यतिरिक्त, हे अॅप कोविड -19 टाळण्यासाठी टिप्स देखील प्रदान करते. युजर्सला या विषाणूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात. हे अॅप सांगते की, युजर्समध्ये या विषाणूची लक्षणे आहेत की नाही. जर तुम्हाला जवळपास असलेल्या कोरोना ग्रस्त रूग्णांची ओळख पटवायची असेल तर आजच तुमच्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करा.