Coronavirus : ‘कोरोना’ चाचणीसाठी सरकारी डॉक्टरांची परवानगी बंधनकारक नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसवर मात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जास्तीत जास्त चाचण्या करणे, जेणेकरून या आजाराचा प्रसार रोखला जाईल. परंतु सद्य मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड-१९ चाचणीसाठी फक्त सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच लिहू शकतात. यामुळे अधिक चाचण्या घेण्यात अडचणी येत आहेत. आता आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सल्ला दिला आहे की, कोणताही मान्यताप्राप्त डॉक्टर कोविड-१९ चाचणी करण्यास परवानगी देऊ शकेल.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या नोटीसमध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांना संक्रमण असल्याचा संशय आला, तर तो कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी पहिल्याच वेळी रुग्णाला लिहू शकतो. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांचे पालन करून खासगी डॉक्टरांनाही कोविड-१९ चाचणी करण्यास परवानगी देण्यात यावी.

केवळ सरकारी रुग्णालयाकडून परवानगी अनावश्यक

मंत्रालयाने म्हटले आहे की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सरकारी रुग्णालयांना कोविड-१९ चाचणी घेण्यास बंधनकारक केले आहे. यामुळे रुग्णाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण सरकारी रुग्णालयांवर सध्या बराच दबाव आहे. त्यांच्या प्रथम प्राधान्यात गंभीर रुग्णांवरील उपचार आहेत. यामुळे कोविड-१९ च्या चाचणीत वेळ लागत आहे. या कठीण काळात कोरोना टाळण्यासाठी कोविड-१९ ची शक्य तितक्या लवकर चाचणी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रमाणित डॉक्टरांना कोविड-१९ चाचणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी करण्यास बराच विलंब होत आहे.

नुकतेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आयसीएमआरने म्हटले आहे की, राज्यातील सर्व टेस्ट लॅब्सना कोणत्याही वैद्यकीय स्लिपशिवाय चाचण्या करण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांकडूनच तपासणी स्लिप घेण्याची गरज दूर करून सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीस परवानगी देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे.