Mucormycosis Do’s & Don’ts : काळ्या बुरशीपासून बचावासाठी कोविड रूग्णांनी काय करावे? ‘ही’ 9 लक्षणे आणि 12 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या म्युकोरमायकोसिसला एक मोठा आणि गंभीर धोका मानले जात आहे. या फंगल इन्फेक्शनची जास्त प्रकरणे सध्या समोर आलेली नाहीत, परंतु आयसीएमआरने यासबंधीत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी कोविड रूग्णांना रिकव्हरीत मदत करू शकतात. म्युकोरमायकोसिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

ही आहेत म्युकोरमायकोसिसची महत्वाची लक्षणे :
1 सर्वप्रथम चेहर्‍याच्या ठेवणीत बदल दिसू लागतो
2 काही संवेदनाक्षम लक्षणे आणि महत्वाच्या अवयवांचे नुकसान करू शकतात
3 भयंकर डोकेदुखी होणे
4 डोळ्यांची दृष्टी खराब होणे
5 गाल, डोळे आणि चेहर्‍यावर सूज
6 गालाच्या हाडांमध्ये वेदना आणि सूज येणे
7 चेहर्‍याच्या एका भागात वेदना होणे किंवा बधीरता येणे
8 संभ्रमाची स्थिती जाणवणे
9 नाकाच्या जवळपासची त्वचा काळी पडणे

म्युकोरमायकोसिसपासून बचाव करा
1- कन्स्ट्रक्शन साईटवर जात असाल तर मास्क आवश्य घाला
2- बागकाम करताना खत किंवा मॉसला स्पर्श करण्यापूर्वी शूज, लांब पँट, लांब बाह्यांचे शर्ट आणि हँड ग्लव्हज घाला
3- हायजीनची काळजी घ्या, रोज आंघोळ करा

काय करावे
4- हायपरग्लायसीमियाला नियंत्रित करा
5- कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर शुगर लेव्हल मॉनिटर करा
6- स्टेरॉयडचा वापर विवेकपूर्ण पद्धतीने करा – योग्यवेळ, योग्य डोस आणि कालावधी
7- ऑक्सीजन थेरेपीदरम्यान ह्यूमिडिफायरासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा
8- अँटीबायोटिक्स / अँटीफंगलचा उपयोग विवेकपूर्ण पद्धतीने करा

काय करू नये
9- संकेत आणि लक्षणांकडे दुर्लर्क्ष करू नका
10- अवरोधित नाकवाल्या सर्व प्रकरणांकडे जीवाणु सायनसाइटिसचे प्रकरण म्हणून पाहू नका, विशेष करून जर तुम्ही कोविड-19 पॉझिटिव्ह आहात.
11- काळ्या बुरशीच्या संसर्गाचा शोध घेण्यासाठी सर्व प्रकारच्या चाचण्या करा, मागे हटू नका.
12- म्युकोरमायकोसिसचा उपचार करण्यात कोणताही उशीर करू नका.