शरीरातील सर्व टॉक्सिन्स दूर करण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज प्या तुळशीचा काढा, ‘हे’ आहेत 4 फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – घरातील आंगणात लावली जाणारी तुळस पूजाविधीसाठी वापरली जातेच, शिवाय तिच्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने अनेक आजार बरे करण्यासाठी ती उपयोगी आहे. तुळशीचा एक काढा आजारावर खुप उपयोगी आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी दिलेल्या सल्ल्यात हा काढा पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सकाळी हा काढा प्यायल्यास हंगाम कोणताही असो तुम्ही निरोगी रहाल.

तुळशीच्या काढ्याचे फायदे
1 शरीरातील टॉक्सिन्स सहजपणे बाहेर काढले जातात.
2 इम्यून सिस्टम सुधारते.
3 बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटीशी संबंधीत समस्या सुद्धा रोज काढा प्यायल्याने दूर होतात.
4 सर्दी, ताप, घशात खवखव यावर हा काढा रामबाण आहे.

कोणती तुळस वापरावी?
तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक हिरव्या रंगाची, जिला राम तुळस म्हणतात आणि दुसरी थोडी निळ्या रंगाची, जिला कृष्ण तुळस म्हटले जाते. राम तुळस मसालेदार आणि कडू, गरम, सौम्य, पाचक, मुलांची सर्दी-खोकला दूर करण्यासाठी वापरली जाते. तर कृष्ण तुळस मसालेदार आणि कडू, मुलायम, पचायला हलकी, शोषक आणि वात-पित्तात लाभदायक असते.

तुळशीचा काढा बनवण्याची कृती
एका पॅनमध्ये एक कप पाणी घेऊन ते उकळवा. आता त्यामध्ये 7-8 तुळशीची पाने, 1/2 चमचा ओवा, 2-3 काळीमिरी, 3-4 लवंग, चिमुटभर मीठ, 1/2 तुकडा आले टाका. पाणी जोपर्यंत निम्मे होत नाहीत तोपर्यंत उकळवा. यानंतर ते गाळा आणि चहासारखे गरम-गरम प्या.