‘चहा’ पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मेंदूसाठी आहे ‘फायदेशीर’

पोलीसनामा ऑनलाईन : चहा पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका अलीकडील अभ्यासामध्ये असा दावा केला गेला आहे की दररोज चहा पिणाऱ्यांचे माईंड (मेंदू) चहा न पिणाऱ्यांपेक्षा चांगले ऑर्गनाईज होते. मेंदूच्या प्रत्येक भागाचे योग्य पद्धतीने काम करणे निरोगी संज्ञानात्मक कार्या (healthy cognitive function) शी संबंधित आहे. या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी 36 वृद्ध लोकांच्या मेंदूंच्या न्यूरोइमेजिंग डेटाचा अभ्यास केला.

या अभ्यासाच्या संदर्भात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस) चे सहाय्यक प्राध्यापक आणि टीम लीडर फेंग लेई यांनी माहिती दिली की या अभ्यासातून प्रथमच हे उघड झाले आहे की चहा पिण्याने मेंदूवर चांगला परिणाम होतो आणि यामुळे मेंदूची रचना देखील मजबूत होते. दरम्यान वृद्धांच्या मेंदूची क्षमता देखील सुधारली असल्याचे आढळली आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या विषयावर बरीच संशोधने केली गेली होती ज्यावरून असे दिसून आले की चहाचे सेवन लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मूड सुधारतो, हृदय आणि नसांशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो. या अभ्यासामध्ये 60 वर्ष ते 36 वर्षांपर्यंतच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्याअंतर्गत त्यांची जीवनशैली, सायकॉलॉजी आणि आरोग्याशी संबंधित माहिती संकलित केली गेली होती.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहे. पोलीसनामा ऑनलाईन या गोष्टीची पुष्टी करत नाही. यावर अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)