काकडी खाऊन पाणी पिल्याने होतात दुष्परिणाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- उन्हाची तीव्रता वाढली आहे. सूर्य आग ओकतो आहे. असे असताना उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारी काकडी सर्रास सेवन केली जाते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण काकडीचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे धोक्कादायक ठरू शकते असे आहार तंज्ञानाचे मत आहे.

काकडीमध्ये पाण्य़ाचं प्रमाण जास्त आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असल्यामुळे उन्हाळ्यात काकडी खाणे फादेशीर ठरते. बहुतांश लोकं वजन कमी करण्यासाठीसुद्धा काकडी खातात. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तत्त्व, व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. म्हणूनच उन्हाळ्यात काकडी खाणं लाभदायक ठरतं.

पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्य़ा काकडीमध्ये जवळपास ९५ टक्के पाणी असते. ज्यामुळे उन्हाळ्यात मानवी शरीरात पाण्याची कमतरता अजिबात निर्माण होत नाही. तसेच यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, आणि सिलिका सारखे तत्त्वही असतात.

काकडी खाऊन पाणी पिल्याने काय होतो परिणाम ?

–काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

–काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातलं मेटाबॉलिजम खराब होतं

–तसंच अपचनाचीही समसया निर्माण होते.

–जर काकडी खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच पाणी प्यायलात, तर तुमच्या शरीराला काकडीतल्या पोषक तत्त्वांचा उपयोग नाही.

–वास्तविक पाहता, कच्चं सलाद खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमचं शरीरातीले पोषक तत्वं पूर्णतः सोकले जात नाहीत.

–त्यामुळे काकडी खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नेये असा सल्ला आहार तज्ञ देतात.

–शरारीतलं ग् लायसेमिक इंडक्स (GI) झपाट्यानं कमी होतं. यामुळे पचनक्षमता आणि अब्सॉर्ब करण्याची प्रिक्रिया मंदावते. असं झाल्यास तुमचं शरीर तुमच्या आतड्यांकडून जास्त काम करून घेतं आणि इतरवेळेस सारखं तुमचं शरीर काम करणं बंद करतं.