खुशखबर ! आता एकाच कॅप्सूलने बरा होणार ‘हा’ जीवघेणा आजार

पुणे : पोलीसनामा  ऑनलाईन – डायबिटीज हा एक गंभीर आजार आहे. दिवसेंदिवस अनेकजण या आजाराच्या जाळ्यात अडकत आहेत. कमी वयातही अनेकांना हा आजार होत आहे. पण दुर्दैवाने यावर ठोस असा कोणताही उपचार नाही. चांगला डाएट आणि एक्सरसाइज करून हा आजार कंट्रोल करू शकतो. डायबिटीजचे पीडित रुग्ण जे इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात, त्यांच्यासाठी एका  संशोधकांनी एक अशी कॅप्सूल तयार केली आहे, जी खाल्ल्यावर तुम्हाला इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही. ही कॅप्सूल एका ब्लूबेरी आकाराची असेल, डायबिटीजच्या रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. कारण याने नेहमी इंजेक्शन घेणाऱ्याचा त्रास कमी होणार आहे.

हे ही वाचा – माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी २ जण ताब्यात 

पीडित रुग्णांना जगण्यासाठी नियमितपणे इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची गरज असते. मात्र आता ही कॅप्सूल आल्याने या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हॉर्वर्डच्या संशोधकांनुसार, या कॅप्सूलमध्ये सोमा नावाचं एक लहान डिव्हाइस ठेवण्यात आलं आहे. ज्यात इन्सुलिन किंवा इतर औषधे भरली जाऊ शकता. पोटात गेल्यावर सोमामधील औषधं शरीरात रिलीज होतात. त्यानंतर हे छोटं डिव्हाइस मलाशयाद्वारे शरीरातून बाहेर पडते. सध्या या उपकरणाचा प्रयोग डुक्कर आणि उंदरांवर केला जात आहे. तीन वर्षात मनुष्यांवरही याचा प्रयोग केला जाणार आहे. इतरही यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या डिव्हाइसला एक मोठं यश मानलं आहे. WHO नुसार, भारतात ३१, ७०५, ००० डायबिटीजचे रुग्ण आहेत आणि २०३० पर्यंत यांची संख्या १०० टक्क्याच्या दराने ७९, ४४१, ००० पर्यंत पोहोचेल.
इंग्लंडच्या ग्लासगो विश्वविद्यालयच्या संशोधकांनी सांगितले की, एका आठवड्यात केवळ १५ मिनिटे एक्सरसाइज करून डायबिटीजला
दूर केलं जाऊ शकते. हा रिसर्च एक्सपरिमेंटल फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. रिसर्चनुसार, सहा आठवडे केवळ १५ मिनिटे वर्कआउट केल्याने इंसुलिन संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते. इतकेच नाही तर याने पुरुषांचे मसल्स साइज आणि क्षमताही वाढते.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like