व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करण्यासाठी नियमित खा ‘हे’ 8 पदार्थ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निरोगी राहण्यासाठी पोषकतत्वांची आवश्यकता असते. यासाळी डाएटमध्ये रोज व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्ससह आवश्यक तत्त्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. यापैकी व्हिटॅमिन बी-12 हे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेवूयात…

व्हिटॅमिन बी-12 काय आहे
व्हिटॅमिन बी-12 हे व्हिटॅमिन सी च्या समतुल्य आहे. यास कोबालमीन म्हणतात. यात कोबाल्ट आढळते, जे इतर व्हिटॅमिनमध्ये नसते. हे लालपेशींसाठी खुप आवश्यक आहे. यामुळे ब्रेन हॅमरेजचा धोका कमी होतो.

विटामिन बी-12 च्या कमतरतेची लक्षणे
थकवा, कमजोरी, शरीरात रक्ताची कमतरता, डोकेदुखी, भूक न लागणे, त्वचा पिवळी पडणे, तोंडात फोड, तणाव.

काय खावे
1 रेड मीट
2 मासे
3 शेलफिश
4 शेंगा
5 अंडी
6 बीन्स
7 सुकामेवा
8 दूध आणि दुधाची उत्पादने