Immunity Weaken Foods : अन्न जे तुमची रोगप्रतिकार शक्ती करतं कमी, जाणून घ्या कसं

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना कालावधीत आयुष मंत्रालय सतत लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देत आहे, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. आपण रोग प्रतिकार शक्ती वाढवणार्‍या गोष्टींची माहिती तर ठेवतोच, पण याकडे लक्ष देत नाही कि रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे पदार्थ कोणते? जेणेकरून आपण त्या गोष्टींबद्दल माहिती मिळवून आपल्या आहाराची पद्धत निश्चित करू.

आपण नकळत अशा अन्न आणि द्रव पदार्थांचा वापर करत आहोत, ज्याचा आपल्या प्रतिकार शक्तीवर थेट परिणाम होतो.

आपल्या रोजच्या आहारात अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करत आहेत. जर तुम्ही त्या खायच्या कमी केल्या, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहील. तुमच्या आहारातील कोणत्या गोष्टीं तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी करत आहेत, ते जाणून घेऊया.

मीठाचे सेवन कमी करा
मिठाशिवाय खाण्यात मजा येत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे की मीठ जास्त प्रमाणात वापरल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्याने बॅक्टेरियाविरूद्ध लढा देण्याची शरीराची क्षमता कमी होते. शरीर लवकरच आजाराला बळी पडते. त्यामुळे जर तुम्हीही मीठ जास्त वापरत असाल, तर सर्वप्रथम मीठ कमी खाण्याची सवय लावा.

चहा आणि कॉफी देखील करत आहे रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम
आपण विनाकारण चहा आणि कॉफी पिण्याची सवय लावून घेतो. या सवयी तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करते. कोरोना टाळायचा असेल, तर तुमची ही सवय नियंत्रित करा. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करा.

जर तुम्ही गोड जास्त खात असाल, तर तुमची सवय बदला. जास्त गोडही प्रतिकारशक्ती कमी करते. खूप गोड तुमच्या आरोग्यास हानिकारक आहे, म्हणून गोड मर्यादित प्रमाणात खा. लक्षात ठेवा की महिलांनी दिवसात फक्त ६ चमचे साखर वापरावी, तर पुरुषांनी दिवसभरात ९ चमचे साखर वापरावी.

एनर्जी ड्रिंक्स देखील करतात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत
कोणत्याही प्रकारचे एनर्जी ड्रिंक आपली रोग प्रतिकार शक्ती कमकुवत करते. त्यामध्ये अशा बर्‍याच गोष्टी आढळतात, ज्या थेट रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करतात. तुम्ही हवे तर घरगुती एनर्जी ड्रिंक तयार करून पिऊ शकता.