कोणत्याही उपकरणांशिवाय घरी करा ‘हे’ 5 सोपे वर्कआऊट्स, रहाल ‘फिट’ आणि ‘अ‍ॅक्टिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जर तुम्ही जिमला जाऊ शकत नसाल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण घरातच कोणतेही व्यायामाचे साधन न वापरता तुम्ही तुमचा फिटनेस मेंटेन करू शकता. होय, असे कितीतरी व्यायाम प्रकार आहेत ज्याच्याकरीता कोणत्याच साधनांची आवश्यकता भासत नाही. स्ट्रेंथ वाढवण्याबरोबरच मसल्स आणि एब्स बनवण्यासाठी हे व्यायाम प्रकार एकदम परफेक्ट आहेत. चला याबाबत जाणून घेऊया…

1. पुशअप्स
हा एक चांगला व्यायाम आहे. यामध्ये, खांद्यांच्या मदतीने शरीराला वरच्या बाजूस वर खेचून घ्या आणि खाली जमिनीवर स्पर्श केले जाते. हा व्यायामप्रकार पेक्टोरल मसल्स (छातीचे मसल्स )ट्रायसेप्स आणि अँटीरिअर डेल्टॉइड्स यांना मजबूत बनवते. हा व्यायाम प्रकार करण्यासाठी जमिनीकडे पोट असलेल्या अवस्थेत झोपून आपल्या हातांनी जोर देत शरीराचा पुढचा भाग जमिनीपासून वर उचला. हात जमिनीवर ठेऊन आणि पायांना पंजांच्या आधारावर जोर लावत पूर्ण शरीर जेवढे वर घेता येईल तेवढे वर उचला. हात आणि खांदे सरळ असायला हवेत. एक सेकंद थांबा, नंतर कोपर वाकवून, शरीरास खाली खेचा. हे 15 वेळा पुन्हा करा.

2. स्किपिंग
हा एक खूप जुना आणि पारंपारिक व्यायाम आहे, जो जवळजवळ प्रत्येकाने त्यांच्या बालपणात केला असावा. कॅलरी बर्न करण्यासाठी हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. दररोज 20-30 मिनिटे स्किपिंग करून आपण कॅलरी सहज बर्न करू शकता.

3. क्रंचेस
हा व्यायाम फ्लॅट अ‍ॅबसाठी सर्वोत्तम आहे. यासाठी आपले गुडघे दुमडून सरळ आपल्या पाठीवर झोपा. मग आपले हात दुमडा आणि तळवे डोक्याखाली ठेवा. कोपर खांद्यांना समांतर असावे. आपल्या हातांनी मानेला आधार द्या. मान सरळ रेषेत ठेवा.आपली कमर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. जमिनीवरून खांद्यांना आधार देताना कंबर वर करा. यामुळे खालच्या ओटीपोटावरील स्नायूंवर ताण जाणवतो. असे 15 वेळा करा.

4. स्क्वाट्स
हा व्यायाम प्रकार एक कंपाऊंड म्हणजे संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, जो मांडी, हिप्स, हेमस्ट्रिंग्स आणि बटक्सच्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे. त्याच वेळी, हाडे, लिगामेंट्स आणि लोअर बॉडी मजबूत करतो आणि बॉडी शेप मध्ये येण्यास मदत करते.

5. प्लँक
याला एब्डॉमिनल ब्रिज म्हणून देखील ओळखले जाते. हा एक आइसोमट्रिक कोअर स्ट्रेंथ व्यायाम आहे , जो एब्डॉमिन ,पाठ आणि खांद्यांना मजबूत करतो.