COVID-19 & Lung Damage : ‘कोरोना’च्या अलक्षणी रूग्णांच्या फुफ्फुसांनाही होते गंभीर नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होती. वेगाने वाढणार्‍या विषाणूमुळे संशोधक आणि वैद्यकीय कर्मचारी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर लवकरच कोरोना विषाणू म्हणजेच कोविड -19 चे अलक्षणी (एसीम्प्टोमॅटिक) पॉझिटिव्ह प्रकरणे देखील आढळू लागले.

कोरोना विषाणूची अलक्षणी प्रकरणे

या नवीन माहितीने बर्‍याच गोष्टी स्पष्ट केल्या, विशेषत: हे जाणून घेणे सोपे झाले की प्रकरणे वेगाने कशी वाढत आहेत. तथापि, हे अलक्षणी प्रकरणे संसर्ग पसरवतात की नाही हे अद्याप देखील स्पष्ट झाले नाही. कोरोना विषाणू चाचणीत सकारात्मक आढळले बहुतेक लोक हे अलक्षणी असतात, म्हणजेच त्यांना या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कोरोना विषाणूचे अलक्षणी लोकसुद्धा स्वत:ला खूप भाग्यवान मानतात कारण त्यांना या प्राणघातक संसर्गाच्या उपचारातून जाण्याची गरज भासत नाही. त्यांना असेही वाटते की व्हायरस त्यांच्या शरीरावर जास्त नुकसान करु शकला नाही. तथापि, एक नवीन संशोधन दुसरेच काहीतरी सांगते.

कोरोनाच्या एका प्रकरणाबाबत बोलताना एका डॉक्टरांनी सांगितले की कसा कोविड -19 मुळे झालेल्या न्यूमोनियामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तथापि वैद्यकीय पथकाने सावधगिरीने त्याच्यावर उपचार केले होते. दुसरीकडे, कोरोनाच्या एका रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर पाठवले गेले होते, तेव्हा ती व्यवस्थित दिसत होती, परंतु जेव्हा तिच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी पाहिली तेव्हा ती अगदी कमी होती. असे असूनही ही मुलगी शुद्धीवर आहे हे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले.

अलक्षणी रूग्णांना फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते

चीनच्या वुहानमध्ये झालेल्या संशोधनानुसार कोरोनाच्या एका अलक्षणी रूग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसातील संसर्ग दिसून आला. तथापि, कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्येही फुफ्फुसांमध्ये अशा प्रकारचा संसर्ग दिसून येत नाही. कोरोनाचे अलक्षणी प्रकरणे कमी नसतात, परंतु समस्या अशी आहे की अलक्षणी आजार देखील फुफ्फुसांना गंभीरपणे नुकसान करीत आहे. तसेच रुग्ण न्यूमोनिया किंवा श्वसन समस्यांशी संबंधित कोणतीही लक्षणे दर्शवित नाही.

लक्षणे न दिसणे हे केवळ यामुळेच धोकादायक नाही की त्यामुळे नकळत अनेक लोकांना संसर्ग होतो, तर अशा प्रकरणांमध्ये अवयवांचे नुकसान देखील होते आणि त्यावर उपचार देखील होत नाही कारण त्याबाबत काही माहितच नसते. कोरोना विषाणूच्या अलक्षणी प्रकरणांमध्ये अचानक मृत्यू किंवा अवयवांचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.