चुकूनही इतक्या महिन्यांपर्यंत वापरू नका एकच अंडरवेअर्स, एक्सपर्टचा खुलासा – ‘किती दिवसात बदलले पाहिजेत अंडरवेअर्स?’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आपण नेहमी छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. यामध्ये पर्सनल हायजीनकडे तर बहुतांश वेळा दुर्लक्ष केले जाते. भारतात लोक अंडरवेयर तोपर्यंत बदलत नाहीत जोपर्यंत ती फाटत नाही. जर यासाठी वर्षभरापेक्षा जास्त वेळ लागला तरी अनेकांना याबाबत आक्षेप नसतो. परंतु आता ब्रिटनच्या एक्सपर्टने खुलासा केला आहे की, अखेर एका व्यक्तीने आपले अंडरवेअर किती काळापर्यंत घालावेत ? विशेषकरून महिलांसाठी ही बातमी खुप आवश्यक आहे. एक्सपर्टने सांगितले की, महिलांनी आपल्या ब्रा एका ठराविक कालावधीनंतर बदलल्या पाहिजेत.

सीक्रेटचा खुलासा
इंटिमेट हेल्थ स्पेशालिस्टने रिसर्चनंतर खुलासा केला आहे की, मनुष्याचे अंडरवेअर्स सुद्धा एका ठराविक काळानंतर नुकसान करू लागतात. ब्रिटनच्या कॉस्मेटिक डॉक्टर शिरीन लखानी यांनी सांगितले की, लोकांनी आपल्या अंडरवेयर दरवर्षी बदलल्या पाहिजेत. एक वर्षाच्या आत यामध्ये असे बॅक्टेरिया तयार होतात जे मशीनमध्ये धुतल्यानंतर सुद्धा निघत नाहीत.

वाढते इन्फेक्शन
रिसर्चचा महत्वाचा भाग असलेल्या स्पेशालिस्ट स्टेफनी टेलर यांनी म्हटले की, महिलांनी असे करणे खुप आवश्यक आहे. महिलांची ब्रा सर्वात जास्त काळापर्यंत त्यांच्या निपल्सच्या संपर्कात राहते. वर्षभरानंतर ब्रामधील बॅक्टेरिया नुकसान करू लागतात. अशावेळी महिलांनी आपली ब्रा सुद्धा एक वर्षाच्या आत बदलली पाहिजे.

यावेळी घालू नका अंडरगारमेंट्स
रिसर्चमध्ये सांगितले आहे की, अखेर महिलांनी केव्हा-केव्हा अंडरवेअर नाही घातली नाही पाहिजे? रिसर्चनुसार, महिलांनी रोज जास्तीत जास्त वेळ विना अंडरवेयर्सचे राहावे. यामुळे त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चांगले बॅक्टेरिया ग्रो होतील. सोबतच जिम मध्ये वर्कआऊट करताना अंडरवेयर्स अवॉइड केली पाहिजे. कारण अंडरगारमेंट्स बॉडीच्या थेट संपर्कात असतात, यामुळे याचे फॅब्रिक सॉफ्ट निवडले पाहिजे.