जाणून घ्या पुरुषांमधील वंध्यत्व वाढण्याची ‘ही’ 8 कारणं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याशी निगडीत काही समस्यांना सामोरं जावं लागतं. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्येही काही कारणांमुळं वंध्यत्व येतं. आज आपण यामागील कारणं जाणून घेणार आहोत.

प्रत्येक कपलला वाटतं की त्यांच्या घरी तिसरा पाहुणा यावा. परंतु वंध्यत्व आल्यानं या प्रक्रियेत अनेकदा अडचण येताना दिसते. पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची काही कारणं आहेत. आज याचीच माहिती आपण घेणार आहोत.

पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणं पुढीलप्रमाणे –

1) बदलती जीवनशैली – कामाचा ताण असणं, लॅपटॉप/मोबाईल सारखे गॅजेट्स सतत जननेंद्रियांच्या जवळ असणं (उदा. खिशात मोबाईल असणं), प्रदूषण, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, जंकफूडचं सेवन याचा परिणाम आरोग्यावर होत असतो.

2) धूम्रपान करणं – धूम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचाही शुक्राणूंवर परिणाम होतो. निकोटीनमुळं शरीरात असंतुलन निर्माण होतं. त्यामुळं धूम्रपान केल्याचा परिणाम एखाद्याच्या शुक्राणूच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. वंध्यत्व येण्याचं हेही एक कारण आहे.

3) लठ्ठपणा – लठ्ठपणा हे सर्व आजारांचं मूळ कारण आहे. 30 पेक्षा जास्त बीएमआयचा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडतो. चरबीमुळं शुक्राणूंच्या विकासात महत्त्वपूर्ण बदल घडतात. त्यामुळं निरोगी जीवनशैली स्विकारणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

4) जननेंद्रियांना झालेल्या दुखापती – मार्शल आर्ट्स, सायक्लिंग, इत्यादी खेळांद्वारे जर जननेंद्रियांना दुखापती झाल्या असतील तर यामुळं वंध्यत्व येऊ शकतं.

5) लैंगिक आजार – गोनोरिया किंवा क्लॅमिडियासारख्या लैंगिक आजारांमुळं (एसटीआय) शुक्राणूंची गुणवत्ता कमी झाल्यानं पुरुषांमधील वंध्यत्व देखील वाढू शकतं. यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

6) वाढतं वय – वयाच्या 35 वर्षांनंतर प्रजनन क्षमता कमी होते. म्हणून योग्य वयात लग्न करणं आणि मूल होणं या समस्येला दूर ठेवू शकतं.

7) ट्युमर – कर्करोग आणि नॉनमॅलिग्निगंट ट्युमर पुरुषांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनास कारणीभूत ठरतात.

8) वेरिकोसेल – अंडकोषाला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्यांना सूज येणं, त्यामुळं अंडकोषाला सूज येणं यालाच वेरिकोसेल असं म्हणतात. हे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.