COVID-19 and Fever : कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवस राहतो ताप? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असला तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर 5-7 दिवसांपर्यंत ताप राहतो. काही रुग्णांमध्ये तर 8-14 दिवसही ताप असतो. ताप कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल, अँटिबायोटिक आणि स्टेरॉईडचा डोस द्यावा लागतो. स्टेराईडमुळे ताप कमी होतो. मात्र, बाकी इन्फेक्शन शरीरात राहतो.

कोरोनावर मात केल्याच्या 15-30 दिवसांपर्यंत जर तुम्हाला 99 किंवा त्यावर ताप असेल तर घाबरून जाऊ नका. ताप सातत्याने येत असेल डॉक्टरांकडे जावे.

जर ताप सलग 3 दिवस 100 च्या वर असेल तर तुम्ही याकडे गांर्भीर्याने पाहणे गरजेचे आहे. तापासह इतर लक्षणांवरही लक्ष द्यावे. उन्हाळ्यात मच्छर चावल्यानेही मलेरिया होऊ शकतो. जर तापामुळे थंडी वाजत असेल तर ते मलेरियाचे लक्षणे असू शकतात.

कोरोनातून बरे झाल्यानंतर ताप येण्याची इतर कारणे…
पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका
आजारपणादरम्यान अँटिबायोटिक दिल्याने इन्फेक्शन संपत नाही. रुग्णांना उपचारादरम्यान जेव्हा स्टेरॉईड देणे बंद केले गेले तर जुन्या किंवा नव्या इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते.

बॅक्टेरिअल इन्फेक्शन
टायफाईड किंवा न्यूमोनियाचे इन्फेक्शनमुळे आपल्या शरीरात असते. औषधांच्या सेवनाने इम्युनिटी कमकुवत व्हायला लागते. जशी बॉडी कमजोर होते तसेच बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा जोर दिसतो.

फंगल इन्फेक्शन
फंगल इन्फेक्शन सर्वात आधी कमकुवत इम्युनिटी पॉवर असणाऱ्या लोकांवर हल्ला करतो. उपचारादरम्यान दिले जाणारे औषधेही शरीरावर दुष्परिणाम करु शकतात. जर रुग्णाला मधुमेह असेल तर आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त असेल. त्यामुळे असह्य दुखणे, डोळे लाल होणे, वेगाने डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचारांची गरज आहे.

किडनी इन्फेक्शन
किडनीमध्ये इन्फेक्शन मूत्राशयाची पिशवीपर्यंत पसरतो. सामान्यपणे हा ताप नसतो. जर हे इन्फेक्शन प्रोस्टेटमध्ये पसरला असेल तर ताप येऊ शकतो.

लिव्हरची अडचण
इम्युनिटी मजबूत करण्यात लिव्हर महत्वाची भूमिका बजावतो. अन्न पचवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतो. लिव्हरचा त्रास असल्याने अनेकदा ताप येत असतो.