‘या’ 12 पद्धतीने घ्या तुमच्या पायांची काळजी, पायांना आरामाची गरज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण शरीराच्या बहुतेक भागांची काळजी घेतो. पण पायांची काळजी घेण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पाय हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्वचा काळवंडणे, कोरडी होऊन फुटणे किंवा व फंगल इन्फेक्शन होणे या समस्या टाळण्यासाठी बदलत्या ऋतुमानानुसार पायांची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य अणि सौंदर्य हे फक्त चेहरा आणि हातांचे नसते, तर यामध्ये पायाचेही सौंदर्य तेवढेच महत्वाचे असते.

अशी घ्या काळजी

पॅडीक्युअर करताना नखांच्या बाजूची पुर्ण त्वचा निघू नये याची काळजी घ्या.

2 तळव्याची त्वचा कडक असेल, भेगा, घट्टे असतील तर दहा मिनिटे पाण्यात पाय सोडून बसा.

3  स्क्रबरने हलक्या हाताने मृत त्वचा काढावी.

4  टाचांची त्वचा कडक झाली असेल तर रात्री झोपताना मलम लावा आणि सॉक्स घालून झोपा.

साबणाचे पाणी, धुळ, माती, चिखल आणि केमिकलपासून पायांची काळजी घ्या.

मधुमेह असणारांनी विशेष काळजी घ्यावी.

7  पाय धुतल्यानंतर व्यवस्थित कोरडे करत जा.

पायांना मॉईश्चरायजर लावा. ते हवामानानुसार निवडा.

पायांची नखे वाढवू नका.

10  योग्य आकाराच्या चप्पला, शूज वापरा. घट्ट चप्पला वापरू नका.

11  रोज शूज वापरत असाल तर किमान दोन जोड ठेवा.

12  हाय हिल्स घालू नका. वापरत असाल तर त्याची उंची 2 इंचापेक्षा जास्त नसावी.

पायांचे व्यायाम

*  चिखल्यांची समस्या टाळण्यासाठी रात्री झोपताना बोटांच्यामध्ये कॉटनचे बॉल ठेवा.

निवांत वेळी टेनिस बॉल पायाच्या तळव्यांनी रोल करा.