Sugar Option : गोड खाण्याची सवय असेल तर साखरेऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साखरेच्या चहाने आपल्या दिवसाची सुरूवात होते. नंतर दिवसभर विविध माध्यमातून साखर पोटात जात असते. परंतु, जास्त प्रमाणात साखरेच्या सेवनाने शरीराचे मोठे नुकसान होते. म्हणूनच साखरेला ‘फूडलेस फूड’ म्हटले जाते. साखरेमुळे लठ्ठपणा, डायबिटीजचा धोका वाढतो. यामुळे पुढे जाऊन हार्ट अटॅक, कॅन्सर, ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्या होतात. जर गोड खाण्याची आवड असेल तर साखरऐवजी कोणत्या गोड वस्तूंचे सेवन करावे ते जाणून घेवूयात…

खडीसाखर :
खडीसाखर गोडव्यासाठी चांगला पर्याय आहे. यात भरपूर पोषकतत्व तसेच कॅल्शियम आणि मिनरल भरपूर असते.

कोकोनट शुगर :
कोकोनट शुगरसुद्धा साखरेला चांगला पर्याय आहे. ही नारळाच्या झाडातून निघणार्‍या गोड द्रवापासून बनवली जाते. तिच्यात साखरे ऐवढीच कॅलरीज असल्या तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो.

खजुराची साखर :
खोड खजूर भाजून वाटून घेऊन साखरेऐवजी वापरू शकता. चहा, कॉफीसाठी वापरता येत नसले तरी चॉकलेट, पेस्ट्री, हलवा, केकमध्ये वापरू शकता.

गुळ :
गुळ रिफाईंड केला जात नसल्याने यात पोषकतत्व मिळतात. व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. थंडीत जरूर सेवन करावा.

कच्चे मध :
बाजारात मिळणारे कच्चे मध साखरेऐवजी वापरू शकता. याच्यामुळे वजनसुद्धा कमी होते.