बकरीचं दूध ठरतं ‘डेंगू’मध्ये ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निरोगी राहण्यासाठी दूध खुप जरूरी आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन असते, जे शरीरासाठी खुप लाभदायक आहे. बहुतांश भारतीय हे गाय किंवा म्हैशीचे दूध पिणे पसंत करतात, परंतु बकरीचे दूध आरोग्यासाठी खुपच लाभदायक आहे. यामुळे इम्यून सिस्टम व मेटाबॉलिज्म वाढते. डेंगूमध्ये सुद्धा हे प्रभावी आहे. याचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1. इम्यून सिस्टम
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बकरीचे दूध गुणकारी आहे. कारण हे दूध सेलेनियमचा समृद्ध स्रोत आहे, जे इम्यून सिस्टम वाढवते.

2. मेटाबॉलिज्म
शरीराची उर्जा वाढवण्यासाठी मेटाबॉलिज्म चांगले असणे आवश्यक आहे. बकरीचे दूध यासाठी खुप लाभदायक आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटामिन बी, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. सोबतच हे दूध आयर्न आणि कॉपरने समृद्ध आहे, जे तुमचा मेटाबॉलिज्म रेट चांगल्या करण्यास मदत करते.

3. हाडांची मजबूती
हाडे मजबूत होण्यासाठी बकरीचे दूध लाभदायक आहे. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. तसेच यामध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिड ट्रिप्टोफेन असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. हे प्यायल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळता येतो.

4. हृदयरोग
चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. बकरीचे दूध नियमित घेतल्यास ही समस्या टाळता येते. यामध्ये चांगले फॅटी अ‍ॅसिड असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. तसेच यातील पोटॅशियमचा स्तर रक्तदाब कमी करतो.

5. सूज
बकरीच्या दुधात अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे सूज कमी होते. हे प्यायल्यास पेटातील सूजेची समस्या दूर होते.

6. डेंगू
डेंगूवर बकरीचे दूध गुणकारी आहे. डेंगूमुळे ब्लड प्लेटलेट कमी होतात. बकरीचे दुध प्यायल्याने ब्लड प्लेटलेट काउंट वाढतो.