बॅक्टेरिया, व्हायरस नष्ट करण्यासाठी फॉलो करा हात धुण्याच्या ‘या’ सोप्या स्टेप्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे, ज्यामध्ये हाताच्या स्वच्छतेच्या स्टेप्स सांगण्यात आल्या आहेत. यापूर्वी एका गाईडलाईनमध्ये लोकांना घरी मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खुपच जास्त भयंकर ठरत आहे. जाणून घेवूयात हात धुण्याच्या सोप्या टेप्स –

1. हात पाण्याने धुवा

सर्वप्रथम आपले होत 20 सेकंदासाठी सर्व बाजूने धुवा. या दरम्यान हातांना घासून धुवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा हात धुण्यापूर्वी चेहर्‍याला स्पर्श करू नका.

2. हातात साबण किंवा लिक्विड घ्या

आता तुमच्या तळव्यानुसार साबण किंवा लिक्विड घ्या. यानंतर आंगठ्याच्या दिशेने हात मूव्ह करून स्वच्छता करा.

3. वीस सेकंद हात धुवा

आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईनमध्ये 20 सेकंद हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी हातांना दोन्ही बाजूने 20 सेकंदापर्यंत धुवा.

4. असे धुवा आपले हात

हातांचा एक पंजा दुसर्‍या पंजावर रगडत स्वच्छ करा. यानंतर वाहत्या पाण्यात दोन्ही हात चांगले धुवून घ्या. 10 सेकंदपर्यंत हात स्वच्छ पाण्याने धुवू शकता.

5. हात कोरडे करा

यानंतर स्वच्छ कपडा (टॉवेल) अथवा एयर ब्लोअरने आपले हात कोरडे करा. जर हात धुतल्यानंतर हात सुकवले नाही तर हँड-सॅनिटायजरचावापर करणे व्यर्थ आहे. तर, जोपर्यंत हात पूर्णपणे कोरडे होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका.